अक्षय कुमारला घेऊन त्याच्या सहकलाकाराने केला 'हा' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 12:12 IST2017-09-28T06:42:49+5:302017-09-28T12:12:49+5:30

अक्षय कुमारबरोबर टॉयलेट एक प्रेमकथामध्ये काम करणारा अभिनेता देव्येन्यू शर्माचे म्हणणे आहे की, आम्हाला अक्षय  सेटवर  भरपूर मदत करायचा ...

Akshay Kumar was taken by his co-actors and revealed 'Ha' | अक्षय कुमारला घेऊन त्याच्या सहकलाकाराने केला 'हा' खुलासा

अक्षय कुमारला घेऊन त्याच्या सहकलाकाराने केला 'हा' खुलासा

्षय कुमारबरोबर टॉयलेट एक प्रेमकथामध्ये काम करणारा अभिनेता देव्येन्यू शर्माचे म्हणणे आहे की, आम्हाला अक्षय  सेटवर  भरपूर मदत करायचा आणि तो एक ओपन माइंडेड व्यक्त्ती आहे. देव्येन्यू एका इंटरव्ह्यु दरम्यान म्हणाल होता की, अक्षयसोबत काम करणे मी खूप एन्जॉय केले. आम्ही चित्रपट भावांची भूमिका साकारली होती आणि सेटवरसुद्धा आम्ही भावांसारखेच राहायचे. तो आपले डायलॉग आणि सगळ्या गोष्टी मध्ये एकदम परफेक्ट असतो.  पुढे देव्येन्यू म्हणतो की अक्षयकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येक सिननंतर अक्षय आम्हाला विचारतो  की आपण ज्यात काही अजून चांगले करू शकतो का?, अक्षय हा शिकवतो आणि आणि शिकतोसुद्धा. त्याला चित्रपटाबद्दला चांगली समज आहे. 

श्री नारायण सिंगने दिग्दर्शित आगामी चित्रपटात देव्येन्यु झळकणार आहे. हा चित्रपट  ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.  यानंतर तो "एस्सी नबे पुरे सौ" चित्रपटात तो दिसणार आहे याची शूटिंगही त्यांने आधीच पूर्ण केले आहे. 


अक्षय कुमारच्या  टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड तयार केला आहे. कारण हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक चित्रपट ठरला आहे. टॉयलेट: एक प्रेमकथा चित्रपटाने देशभरात आतपर्यंत 133.60 कोटींचा बिझनेस केला आहे. या आकड्यांसोबतच अक्षयने त्याचे 5 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याआधी अक्षयचा सर्वाधिक गल्ला जमावणारा चित्रपट रावडी राठोड होता ज्याने 131 कोटींचा बिझनेस केला होता.  ऐवढेच नाही तर 133 कोटींचा बिझनेस करत टॉयलेट : एक प्रेमकथा यावर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटांने पाच पट कमाई केली आहे. सध्या अक्षय  गोल्डच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोल्डमध्ये तो बलवीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित हा चित्रपट आहे. 15 ऑगस्ट 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ALSO READ : अक्षय कुमारचा त्याची मुलगी नितारासोबतचा हा क्युट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

Web Title: Akshay Kumar was taken by his co-actors and revealed 'Ha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.