केसरीसाठी या गोष्टींचे प्रशिक्षण घेतोय अक्षय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 12:32 IST2018-02-01T07:02:45+5:302018-02-01T12:32:45+5:30

पॅडमॅन रिलीज होण्याच्या आधीच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसुद्धा लागला आहे.‘केसरी’ या चित्रपटाच्या तयारीला अक्षय लागला आहे. यासाठी ...

Akshay Kumar is training for these things | केसरीसाठी या गोष्टींचे प्रशिक्षण घेतोय अक्षय कुमार

केसरीसाठी या गोष्टींचे प्रशिक्षण घेतोय अक्षय कुमार

डमॅन रिलीज होण्याच्या आधीच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसुद्धा लागला आहे.‘केसरी’ या चित्रपटाच्या तयारीला अक्षय लागला आहे. यासाठी तो तोफा चालवण्याचे, तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतो आहे. तसेच तो पंजाबमधील प्रसिद्ध गटका या देसी मार्शल आर्टचे देखील ट्रेनिंग घेत आहे. मेकर्सने या चित्रपटात कला प्रदर्शन करण्याचा विचार केला आहे. अक्षयला या सगळ्याची 15 दिवस ट्रेनिंग दिली जाणार आहे. रिपोर्टनुसार चित्रपटात आखाड्याचे सीन्स कमी आहेत मात्र जे आहेत ते रिअल दिसावेत म्हणून पंजाबच्या आखाड्यामधील खऱ्या कुस्तीपटूंना घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

केसरीचे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले असल्याचे कळते. ही लढाई ‘बॅटल आॅफ सारागढी’ नावाने ओळखले जाते. या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  याच लढाईवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी  ‘बॅटल आॅफ सारागढी’ हा चित्रपट साकारत आहेत. 

लवकरच अक्षयचा पॅडमॅन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. तसेच अक्षय साऊथचा सुपरहिट चित्रपट कंचना 2 च्या हिंदी रिमेकमध्ये सुद्धा झळकणार आहे. अक्षय कुमार 2015मध्ये आलेल्या कंचना 2 च्या रिमेक तयार करणार आहे. या चित्रपटात तिची अभिनेत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.  

Web Title: Akshay Kumar is training for these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.