अक्षयकुमार ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ला प्रमोट करण्यासाठी करणार ‘हे’ काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 21:29 IST2017-07-27T15:59:50+5:302017-07-27T21:29:50+5:30

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा काही फंडा वापरणार आहे की, लोक त्याच्या प्रेमात पडतील यात शंका नाही. होय, खिलाडी अक्षयकुमार बीएमसी अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या सोबतीने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे.

Akshay Kumar 'Toilet: A Love Story' to promote 'O' work! | अक्षयकुमार ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ला प्रमोट करण्यासाठी करणार ‘हे’ काम!

अक्षयकुमार ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ला प्रमोट करण्यासाठी करणार ‘हे’ काम!

ल्याला माहीतच आहे की, बॉलिवूडमधील प्रत्येक मोठा स्टार त्याचा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवनव्या प्रमोशनल स्ट्रॅटेजिजचा आधार घेतात. आमीर खान, सलमान खान असो वा शाहरूख खान सगळेच हटके फंडे वापरून चित्रपटाचे प्रमोशन करीत असतात. आता असाच काहीसा फंडा बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार वापरणार आहे. त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा काही फंडा वापरणार आहे की, लोक त्याच्या प्रेमात पडतील यात शंका नाही. होय, खिलाडी अक्षयकुमार बीएमसी अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या सोबतीने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. 

एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीबरोबर प्रमोशन करण्याची कल्पना अक्षयची आहे. अक्षयने असे ठरविले होते की, प्रमोशन करतानाच शहरातील विषयही मार्गी लावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येतील. खरं तर अक्षय मुंबईतील समस्या जाणून आहे. त्यामुळेच त्याने आज एक कार्यक्रम हाती घेतला असून, शहरातील प्रत्येक वॉर्ड मेंबरबरोबर त्याने चर्चा केली आहे. या कार्यक्रमात अक्षय आणि बीएमसी झोपडपट्टी परिसरातील कचºयाचे नियोजन कसे करता येईल यावर वॉर्ड मेंबरला माहिती देणार आहेत. त्याचबरोबर लोकांना वेस्ट मॅनेजमेंटविषयीदेखील माहिती देणार आहेत. अक्षय या कॅम्पेंनच्या माध्यमातून शहराचे रूप पालटविण्याचा प्रयत्न करणार आहे. 



काही दिवसांपूर्वीच अक्षयची मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्यामुळे चित्रपटापेक्षा मुंबईतील स्वच्छता हा त्याच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय राहणार आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना तो चित्रपटाला प्रमोटही करणार आहे. पण काहीही असो, अक्की एका तीरने दोन निशाने साधत आहे हे नक्की. आता अक्षयचा ही प्रमोशन स्ट्रॅटेजी कितपत फायदेशीर ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Akshay Kumar 'Toilet: A Love Story' to promote 'O' work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.