अक्षय कुमारच्या घरात फिरायचा महिलेचा आत्मा, सांगितला भीतीदायक प्रसंग, म्हणाला- "माझा मुलगा झोपेतच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:48 IST2026-03-18T11:48:02+5:302026-03-18T11:48:30+5:30
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'भूत बंगला' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय कुमार भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, अक्षय खऱ्या आयुष्यात या गोष्टींवर विश्वास ठेवतो का? यावर अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

अक्षय कुमारच्या घरात फिरायचा महिलेचा आत्मा, सांगितला भीतीदायक प्रसंग, म्हणाला- "माझा मुलगा झोपेतच..."
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'भूत बंगला' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयच्या या हॉरर-कॉमेडी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'भूत बंगला'च्या टीझरलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सिनेमात अक्षय कुमार भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, अक्षय खऱ्या आयुष्यात या गोष्टींवर विश्वास ठेवतो का? यावर अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अक्षय कुमारने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, "आम्ही जुहूला एका अशा घरात राहत होतो जिथे काहीतरी गडबड होती. माझी पत्नी नेहमी मला म्हणायची. तेव्हा माझा मुलगा आरव ४-५ वर्षांचा असेल. मी पत्नीला म्हणायचो की तू शिकलेली आहेस. तू अशा गोष्टी कशा काय करू शकतेस? ती मला सांगायती की घरात एका महिलेच्या चालण्याचा आवाज येतो. एक दिवस माझा मुलगा झोपला होता. आणि झोपेतच त्याने काहीतरी दाखवलं आणि म्हणाला की इथे राहू नका. इथून जा...मी त्याला विचारलं की तू कोणाशी बोलत आहेस. काही मिनिटांसाठी मी पण घाबरलो होतो. तेव्हा माझी पत्नी म्हणाली की मी तुला बोलत होते ना काहीतरी गडबड आहे. आरव कोणासोबत तरी बोलत असतो".
पुढे अक्षय म्हणाला, "तेव्हापासून माझ्या या गोष्टीवर विश्वास बसला आहे. भूत असतील किंवा मग निगेटिव्ह एनर्जी तर असतेच. मला असं वाटतं की अशा गोष्टी असतात. असं म्हणतात की काही लोक पॉझिटिव्ह एनर्जीचे असतात. तर काही लोकांकडे निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होत असतात. त्यामुळेच आपल्या आजूबाजूलाही नेहमी कोणती ना कोणती एनर्जी असते".