अक्षय कुमारचा अजून एक फ्लॉप! 'सरफिरा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 17:18 IST2024-07-13T17:18:27+5:302024-07-13T17:18:45+5:30
अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. पण, अक्षयचा हा सिनेमाही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येऊ शकला नाही. सरफिरा सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आला आहे.

अक्षय कुमारचा अजून एक फ्लॉप! 'सरफिरा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' रुपये
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या 'सरफिरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी(१२ जुलै) अक्षयचा हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला. 'सूराराई पोट्टरू' या साऊथ सिनेमाचा हा रिमेक आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. पण, अक्षयचा हा सिनेमाही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येऊ शकला नाही. सरफिरा सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आला आहे.
खरं तर 'सूराराई पोट्टरू' हा दाक्षिणात्य सिनेमा प्रचंड गाजला. पण, त्याचा रिमेक असलेला अक्षयचा 'सरफिरा' मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. त्यामुळे अक्षयच्या फ्लॉप सिनेमांच्या यादीत आणखी एका सिनेमांची भर पडली आहे. 'मिशन रानीगंज', 'सेल्फी', 'बेल बॉटम', 'बड़े मियां छोटे मियां' या सिनेमांपाठोपाठ अक्षय कुमारचा सरफिरादेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, अक्षयच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ २.५ कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
'सरफिरा' या सिनेमाचं दिग्दर्शन सुधा प्रसाद यांनी केलं आहे. या सिनेमात अक्षयबरोबर राधिका मदन, सौरभ गोयल, परेश रावल, सीमा बिस्वास यांच्या मुख्य भूमिका आहेत.