अक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकल पीरियड्सविषयी मुलगा आरवसोबत मोकळेपणाने बोलते’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:34 IST2018-01-04T11:04:21+5:302018-01-04T16:34:21+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम ...

Akshay Kumar said, 'About the twinkle periods, son speaks freely with Aarav'! | अक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकल पीरियड्सविषयी मुलगा आरवसोबत मोकळेपणाने बोलते’!

अक्षयकुमारने म्हटले, ‘ट्विंकल पीरियड्सविषयी मुलगा आरवसोबत मोकळेपणाने बोलते’!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या रिअल लाइफवर आधारित आहे. ज्यांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वस्त पॅड उपलब्ध करून दिले होते. काही दिवसांपूर्वीच अक्षयने चित्रपटाचे प्रमोशन करताना त्याच्या या चित्रपटावरून काही खुलासे केले. अक्षयने म्हटले की, आपल्या देशात पीरियडसारख्या विषयावर आजही बोलले जात नाही. अशा विषयावर चर्चा करणे टॅबू समजले जाते. मात्र माझ्या घरात असे अजिबात नाही. कारण माझी पत्नी ट्विंकल मुलगा आरवसोबत या विषयावर अतिशय मोकळेपणाने बोलते. माझ्या पत्नीने मोठा मुलगा आरवला याविषयी सर्व काही सांगितले आहे. आमच्या परिवारात या विषयावरून कुठलीच गोष्ट लपवून ठेवली जात नाही. 

पुढे बोलताना अक्षयने म्हटले की, आजही आपल्या देशात ८२ टक्के महिला अशा आहेत, ज्यांच्यापर्यंत अजूनही सॅनेटरी पॅड पोहोचलेच नाहीत. त्यामुळे माझ्या या चित्रपटातून जर यातील पाच टक्के महिला जागृत झाल्या तर मी ही लढाई जिंकली, असे समजेल. अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ज्या महिला पीरियड्सदरम्यान सॅनेटरी पॅडचा खर्च पेलू शकत नाही, त्यांच्याकरिता सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांना ‘पॅडमॅन’ असे नाव पडले. 



आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षयकुमारसह राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने डायरेक्ट केले आहे. डायरेक्टर म्हणून ट्विंकल खन्नाने या चित्रपटातून डेब्यू केला आहे. दरम्यान, अक्षयकुमार आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच आपल्या फॅमिलीलाही प्रचंड महत्त्व देतो. वर्षातून चार-पाच चित्रपट करणारा अक्षय आपल्या परिवारालाही पुरेसा वेळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या फॅमिलीसोबत केपटाऊन येथे गेला होता. याठिकाणी त्याने नवीन वर्ष सेलिब्रेट केले. 

Web Title: Akshay Kumar said, 'About the twinkle periods, son speaks freely with Aarav'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.