अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:25 IST2019-08-07T13:24:27+5:302019-08-07T13:25:07+5:30

मिशन मंगल या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये अक्षयने त्याच्या फिटनेसच्याबाबतीत एक खास गोष्ट सांगितली आहे. 

Akshay Kumar reveals how he lost weight for his upcoming films | अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य

अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य

ठळक मुद्देमी कोणत्याही पद्धतीचे डाएट न करता व्यायाम करण्यावर भर देतो. व्यायामाने नैसर्गिक पद्धतीने वजन कमी होते असे मला वाटते. त्यामुळे मी जेवणाचे रुटिन कधीच बदलत नाही.

अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होत असून या चित्रपटात अक्षयसोबतच तापसी पन्नू, विद्या बालन,  सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मिशन मंगल या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये अक्षयने त्याच्या फिटनेसच्याबाबतीत एक खास गोष्ट सांगितली आहे. 

अक्षय कुमार हा केवळ एकच अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षांत आपल्याला तीन-चार चित्रपट पाहायला मिळतात. आता अक्षय कुमार एका वेगळ्या बाजाच्या सूर्यवंशी आणि बच्चन पांडे या चित्रपटात झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांमधील भूमिकांसाठी अक्षयने जवळजवळ सहा किलो वजन कमी केले आहे. अक्षयने वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डाएट न करता केवळ वर्कआऊटद्वारे वजन कमी केले आहे. त्यानेच ही गोष्ट मिशन मंगल या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सांगितली. अक्षयने सांगितले की, मी सूर्यवंशी आणि बच्चन पांडे या दोन्ही चित्रपटांसाठी माझे वजन कमी केले असून वजन कमी करण्यासाठी मी कोणत्याही पद्धतीच्या डाएटचा वापर केला नाही. मी अतिशय सामान्य पद्धतीने माझे वजन कमी केले आहे. मी वजन कमी करण्यासाठी डाएट न करता वर्कआऊटवर भर दिली. 

मिशन मंगल या चित्रपटाच्या या इव्हेंटमध्ये त्याला डाएटबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्याने सांगितले की, मी कोणत्याही पद्धतीचे डाएट न करता व्यायाम करण्यावर भर देतो. व्यायामाने नैसर्गिक पद्धतीने वजन कमी होते असे मला वाटते. त्यामुळे मी जेवणाचे रुटिन कधीच बदलत नाही.

अक्षय कुमारने त्याच्या वयाची पन्नाशी गाठली असली तरी तो आजही अतिशय फिट आहे. त्याच्या फिटनेससाठी त्याची नेहमीच चर्चा केली जाते. अक्षयने आज त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Web Title: Akshay Kumar reveals how he lost weight for his upcoming films