नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही कुठे जायचं?" तर जुही चावला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:52 PM2023-10-16T18:52:55+5:302023-10-16T18:54:06+5:30

पंतप्रधानांच्या गाण्यावर अक्षय कुमारसह, कंगना रणौत, जुही चावलानेही दिली प्रतिक्रिया

Akshay Kumar replies on PM Narendra modi s garba geet says where willl we go now kangana ranaut also tweets | नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही कुठे जायचं?" तर जुही चावला...

नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, "आम्ही कुठे जायचं?" तर जुही चावला...

नवरात्रोत्सवाला थाटामाटात सुरुवात झाली आहे. या नवरात्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खास सरप्राईज दिलं. त्यांनी स्वत: गुजराती भाषेत गरबा गीत लिहिलं. 'माडी' असं गाण्याचं शीर्षक आहे. मीत ब्रदर्सने (Meet Bros) या गीताला संगीत दिलं असून दिव्य कुमारने (Divya Kumar) ते गायलं आहे. आता नरेंद्र मोदी गीतकारही झाले म्हणल्यावर अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

पंतप्रधानांनी काल ट्विटरवर गाण्याचा व्हिडिओ शेअर करत हे सरप्राईज दिलं. 'नवरात्रीच्या पावन सणाला सुरुवात झाली असून मी गेल्या आठवड्यात लिहिलेलं गरबा गीत तुमच्यासोबत शेअर करायला मला अतिशय आनंद होत आहे. सर्वांना सुरेलमय शुभेच्छा. तसंत मीत ब्रदर्स आणि दिव्य कुमारचे आभार' अशा प्रकारे पंतप्रधानांनी ट्वीट केलं.

यावर अक्षय कुमार प्रतिक्रिया देत म्हणाला,'हे अद्भूत आहे. सर तुम्ही आमच्या क्षेत्रातही आलात. आता आम्ही कुठे जायचं? शुभ नवरात्री!'

तर कंगना रणौत म्हणाली,'सतत कामात व्यस्त असताना आणि प्रचंड ताण असतानाही पंतप्रधान पारंपारिक गाणं लिहून आपली आवड जोपासत आहेत हे खरोखरंच कौतुकास्पद आहे.'

याशिवाय जुही चावलानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. तिने लिहिलं,'श्री नरेंद्रभाईंचे अभिनंदन, त्यांचं हे टॅलेंट आणि क्षमता पाहून मी थक्क झाले आहे. किती सुंदर गाणं आहे, गाण्याचे बोल, संगीत तर हृदयाला भिडणारे आहेत. माननीय पंतप्रधानांचा खूप अभिमान वाटतो आणि अशा प्रकारे संस्कृतीचं पालन करता येते म्हणून एक भारतीय असल्याचाही अभिमान वाटतो. सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा.'

पंतप्रधान मोदींच्या या सरप्राईजने सर्वांनाच थक्क करुन सोडलं आहे. तर यावर अक्षय कुमारची प्रतिक्रियाही चर्चेत आहे.

Web Title: Akshay Kumar replies on PM Narendra modi s garba geet says where willl we go now kangana ranaut also tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.