मोठी स्वप्नं बघितली की लोकं वेडं समजतात, अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाची पहिली झलक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:47 IST2024-02-13T12:47:24+5:302024-02-13T12:47:53+5:30

अक्षय कुमारच्या आगामी 'सरफिरा' सिनेमाची पहिली झलक समोर आलीय (Sarfira Movie Announcement)

akshay kumar new movie sarfira official announcement remake of Soorarai Pottru | मोठी स्वप्नं बघितली की लोकं वेडं समजतात, अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाची पहिली झलक समोर

मोठी स्वप्नं बघितली की लोकं वेडं समजतात, अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाची पहिली झलक समोर

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता. अक्षयने आजवर विविध सिनेमांमधून त्याचं स्वतःचं असं फॅन फॉलोईंग निर्माण केलंय. अक्षय नवीन वर्षात 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chota Miyan) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. अशातच अक्षयच्या २०२४ मधील आणखी एका नवीन सिनेमाची पहिली झलत प्रेक्षकांसमोर आलीय. हा सिनेमा म्हणजे 'सरफिरा..' (Sarfira)

'सरफिरा' सिनेमाच्या ४१ सेकंदांची घोषणा असणारा टीझर भेटीला आलाय. या टीझरमध्ये अगदी शेवटी अक्षय कुमार दोन्ही हात मोकळे सोडून बाईक राईडचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. 'तुम्ही मोठी स्वप्नं बघितली की ते तुम्हाला वेडं समजतात', अशी टॅगलाईन देऊन या सिनेमाची शानदार घोषणा करण्यात आलीय. साऊथ इंडस्ट्रीमध्ये गाजलेल्या 'सूराराय पोट्रू'चा हा हिंदी रिमेक आहे.

'सूराराय पोट्रू'बद्दल सांगायचं तर... साऊथ स्टार सूर्या, अपर्णा बारामुरली, परेश रावल सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. सुर्याच्या कामाचं खुप कौतुक करण्यात आलं. हिंदी रिमेकमध्ये सुर्याने साकारलेली भूमिका अक्षय कुमार करणार असून त्याच्यासोबत राधिका मदान, परेश रावल हे कलाकार झळकणार आहेत. १२ जुलै २०२४ ला 'सरफिरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title: akshay kumar new movie sarfira official announcement remake of Soorarai Pottru