पर्समध्ये पत्नी ट्विंकलचा नाही तर या व्यक्तीचा फोटो ठेवतो अक्षय कुमार, स्वतःच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:48 IST2025-05-28T09:47:55+5:302025-05-28T09:48:24+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या 'हाऊसफुल ५' (Housefull 5) चित्रपटामुळे चर्चेत आहे.

पर्समध्ये पत्नी ट्विंकलचा नाही तर या व्यक्तीचा फोटो ठेवतो अक्षय कुमार, स्वतःच केला खुलासा
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या 'हाऊसफुल ५' (Housefull 5) चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या दरम्यान त्याच्यासोबत संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये अभिनेत्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्याने त्याच्या पर्समध्ये कोणाचा फोटो ठेवतो हे देखील सांगितले. हा फोटो त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा नसल्याचंही त्याने सांगितले.
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा स्टार आहे जो केवळ त्याच्या अॅक्शनसाठीच नाही तर त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी देखील ओळखला जातो. पण अक्षय कोणाला अभिनयात आपला गुरु मानतो हे फार कमी लोकांना माहिती असेल. 'हाऊसफुल ५' च्या ट्रेलर लाँच दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्वतः हा खुलासा केला आहे.
या अभिनेत्याचा फोटो पर्समध्ये ठेवतो
प्रसार माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, 'मी चार्ली चॅप्लिनचा खूप मोठा चाहता आहे. तो न बोलता करत असलेली विनोदी भूमिका अजिबात सोपी नव्हती. भावनेने कोणालाही हसवणे ही मोठी गोष्ट आहे. हेच कारण आहे की मला तो आवडतो आणि तुम्ही लोक त्यावर विश्वास ठेवणार नाही. मी त्याचा फोटोही नेहमी माझ्या पर्समध्ये ठेवतो.'
कधी रिलीज होणार 'हाऊसफुल ५'?
हाऊसफुल ५ बद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ६ जूनला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर २७ मे रोजी लाँच झाला. ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात अनेक मोठे बॉलिवूड स्टार दिसणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.