Sooryavanshi Box Office Collection : ‘सूर्यवंशी’ सुसाट! सहा दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:47 PM2021-11-11T15:47:01+5:302021-11-11T15:47:32+5:30

Sooryavanshi Box Office Collection Day 6 : 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणारा ‘सूर्यवंशी’ या वर्षातला पहिला चित्रपट ठरला आहे.

akshay kumar katrina kaif film Sooryavanshi Box Office Collection Day 6 | Sooryavanshi Box Office Collection : ‘सूर्यवंशी’ सुसाट! सहा दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Sooryavanshi Box Office Collection : ‘सूर्यवंशी’ सुसाट! सहा दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

googlenewsNext

अक्षय कुमारचासूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Sooryavanshi Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. 5 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. परिणामी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. केवळ पाच दिवसांत ‘सूर्यवंशी’ने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.  बुधवारी 6 व्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली.
बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी ‘सूर्यवंशी’ने 9.55 कोटींचा बिझनेस केला. वीक डेजमध्ये हा आकडा मोठा आकडा मानला जातोय. याचसोबत 6 दिवसांत ‘सूर्यवंशी’च्या एकूण कमाईचा आकडा 112.25 कोटींवर पोहोचला आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने 26 कोटी 38 लाख रुपयांची कमाई केली होती तर  दुस-या दिवशी 24 कोटी 53 लाख रुपये कमावले. चौथ्या व पाचव्या दिवशी अनुक्रमे 14.25 कोटी आणि 11.50 कोटी रूपयांचा गल्ला जमवला. बुधवारी सहाव्या दिवशी कमाईचा आकडा किंचित कमी झाला. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 9.55 कोटींचा बिझनेस केला.

जाणकारांच्या मते, या आठवड्यात अक्षयचा सिनेमा 150 कोटींची कमाई करेल, अशी अपेक्षा आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात 3500 स्क्रीन्सवर आणि परदेशात 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रात 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे.  ‘सूर्यवंशी’सोबत ‘एटर्नल्स’ हा हॉलिवूड चित्रपट  देखील प्रदर्शित झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे.

Web Title: akshay kumar katrina kaif film Sooryavanshi Box Office Collection Day 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.