अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:58 PM2023-11-05T13:58:26+5:302023-11-05T13:59:07+5:30

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची उत्सुकता खूपच ताणली आहे.

Akshay Kumar jumps from a helicopter Sooryavanshi makes a banging entry in Singham Again | अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री

अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again)च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यावेळी 'सिंघम' अजय देवगणसोबतच 'सूर्यवंशी' अक्षय कुमार, 'सिंबा' रणवीर सिंह आणि टायगर श्रॉफचीही एकाच सिनेमात एन्ट्री झाली आहे. तर दुसरीकडे करिना कपूरसह लेडी सिंघम म्हणून दीपिका पदुकोणही दिसणार आहे. नुकतंच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सिंघम अगेन' मधील फर्स्ट लुक समोर आला आहे.

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची उत्सुकता खूपच ताणली आहे. 'सूर्यवंशी' अक्षय कुमारचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अक्की नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलमध्ये दोन्ही हातात मशीन गन घेऊन हेलिकॉप्टरमधून उडी मारताना दिसतोय. हे पाहून चाहते तर एकदम वेडे झाले आहेत.'सिंघम अगेन'मध्ये अक्षय कुमार एटीएस चीफ वीर सूर्यवंशी बनून एन्ट्री करत आहे. तो यामध्ये सिंघम म्हणजेच अजय देवगणच्या मदतीला धावून येणार आहे. 

रोहित शेट्टीने हा फर्स्ट लुक शेअर करत लिहिले, "सिंघम अगेनमध्ये आम्ही तेच करत आहोत जे आमच्या चाहत्यांना पाहायचं आहे. म्हणूनच हा आलाय अक्षय कुमार आणि हे हेलिकॉप्टर. सूर्यवंशीला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्ताने वीर सूर्यवंशी या लढ्यात सिंघमसोबत जोडला गेला आहे."

अक्कीच्या या फर्स्ट लुकवर चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केलाय.  'सिंघम अगेन' रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग आहे. यामध्ये सिंघम, सिंघम 2, सिंबा आणि सूर्यवंशी यांचा समावेश आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: Akshay Kumar jumps from a helicopter Sooryavanshi makes a banging entry in Singham Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.