VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:48 IST2025-10-07T14:47:37+5:302025-10-07T14:48:25+5:30
अक्षयनं विचारलं तुम्हाला संत्री कशी खायला आवडतात, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली नवी पद्धत...

VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
Devendra Fadnavis & Akshay Kumar Interview: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारनेनरेंद्र मोदींना 'तुम्ही आंबे कसे खाता?' हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरुन अक्षयला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र, आता पुन्हा अक्षय कुमारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात त्याच पद्धतीचा "तुम्ही संत्री कशी खाता?" हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर मुख्यमंत्री खळखळून तर हसलेच. पण, सोबतच त्यांनी संत्री खाण्याची त्यांची आवडती पद्धतही सांगितली.
फिक्की फ्रेम्स (FICCI Frames) च्या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमार म्हणाला, "मी आयुष्यात दुसऱ्यांदा मुलाखत घेत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा मी त्यांना आंबा कसा खातात हा प्रश्न केला होता. त्यावेळी लोकांनी माझी खूप खिल्ली उडवली... पण तरी मी सुधरणार नाही... तुम्ही नागपूरचे आहात... मी तुम्हाला विचारणार आहे की, तुम्हाला संत्री कशी खायला आवडतात...? साल काढून खाता की मिक्सरमध्ये टाकून ज्यूस पिता?" अक्षयच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यक्रमात उपस्थित सर्वजण खळखळून हसले.
मुख्यमंत्र्यांनी अक्षयकुमार शिकवला खास धडा, पाहा काय घडलं?#LokmatNews#MaharashtraNews#MarathiNews#DevendraFadnavis#Akshaykumarpic.twitter.com/YQ6oivlFFV
— Lokmat (@lokmat) October 7, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत म्हणाले, "मी तुम्हाला एक नवी पद्धत सांगतो... संत्री असतात ना, त्यांची साल न काढता, त्याचे दोन भाग करा... त्याची साल अजिबात काढू नका आणि त्यावर मीठ घालून खा... जसा आंबा खाता अगदी तसंच ती संत्री खा... तुम्हाला खरंच संत्री खाताना एक वेगळीच चव येईल... ही पद्धत फक्त नागपुरच्याच लोकांना माहीत आहे", असं उत्तर फडणवीसांनी दिलं. यावर "संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो, मी नक्की ते ट्राय करेन" असं अक्षय कुमारने म्हटलं.