"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:43 IST2025-10-22T17:41:14+5:302025-10-22T17:43:58+5:30
अक्षय कुमार सध्या गंभीर मानसिक अवस्थेत असल्याचा खुलासा दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे

"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
अभिनेता अक्षय कुमार सध्या डिप्रेशनसारख्या गंभीर अवस्थेतून जात असल्याची माहिती दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिली आहे. यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अक्षय कुमार सध्या प्रियदर्शन यांच्यासोबत तीन सिनेमांचं शूटिंग करतोय. अशातच तो नैराश्यासारख्या समस्येला सामोरं जात असल्याचा खुललासा प्रियदर्शन यांनी केला आहे. काय म्हणाले प्रियदर्शन? जाणून घ्या.
प्रियदर्शन यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमारने प्रियदर्शन यांना दोनदा फोन केला. अक्षयने सांगितलं की, असरानी सर आता जगात नाहीत, ही गोष्ट तो स्वीकारू शकत नाहीये आणि त्याला डिप्रेशनसारखं वाटत आहे.
अक्षय कुमार आणि असरानी गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून प्रियदर्शन दिग्दर्शित आगामी दोन नवीन चित्रपट 'भूत बंगला' आणि 'हैवान', या चित्रपटांसाठी सलग काम करत होते. या सेटवर असरानी सर अक्षयला नेहमीच मोलाचे सल्ले देत असत. विशेषतः राजपाल यादव आणि इतर कलाकारांना ते जीवनातील चुका कशा टाळायच्या याविषयी सांगायचे. असरानीचं अकस्मात निधन अक्षयसाठी खूप वैयक्तिक आणि भावनिक धक्का देणारं ठरलं आहे, असा खुलासा प्रियदर्शन यांनी केला आहे.
सेटवर असरानी यांच्या तब्येतीबद्दल बोलताना प्रियदर्शन म्हणाले की, ''वयोमानानुसार त्यांना पाठीचा खूप त्रास होता. त्यांच्यासाठी आम्ही सेटवर एक खुर्ची ठेवली होती. जेव्हा कॅमेरा ऑन व्हायचा, तेव्हाच आम्ही त्यांना उठण्यास सांगायचो. इंदूरहून परतताना खराब रस्त्यामुळे त्यांचे पाय दुखत असतानाही, त्यांनी चित्रपटाचे काम पूर्ण करण्यासाठी सेटवर येणं थांबवलं नव्हतं. प्रियदर्शन यांनाही या घटनेमुळे धक्का बसला आहे, पण असरानी यांचा अखेरचा सीन पाच-सहा दिवसांपूर्वी शूट केल्यामुळे ते स्वतःला भाग्यवान मानतात.