अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबाबत केला एक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 11:31 IST2019-07-13T11:30:01+5:302019-07-13T11:31:11+5:30

ट्विंकलला एक अभिनेत्री म्हणून यश मिळाले नसले तरी एक लेखिका म्हणून तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे.

Akshay Kumar Hasn't Read Twinkle Khanna's Books | अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबाबत केला एक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबाबत केला एक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

ठळक मुद्देअक्षयने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सेलिब्रेशन पार्टीला मी केवळ इथून तिथून फिरत होतो. कारण मी ट्विंकलचे अद्याप एकही पुस्तक वाचलेले नाही. 

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे आज बॉलिवुडमधील एक क्युट कपल मानले जाते. खिलाडी कुमारच्या यशात आज ट्विंकलचा सिंहाचा वाटा आहे. ट्विंकलने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला केव्हाच रामराम ठोकला आहे. पण एक लेखिका म्हणून तिने आज तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. आज घर आणि करियर या दोन्ही गोष्टी ती खूपच चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. 

ट्विंकलला एक अभिनेत्री म्हणून यश मिळाले नसले तरी एक लेखिका म्हणून तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. तिच्या फनीबोन्स या पुस्तकाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ट्विंकल आणि अक्षय दोघेही त्यांच्या कामात कितीही व्यग्र असले तरी त्यांच्या कुटुंबियांना ते नेहमीच वेळ देतात. सध्या देखील ते दोघे लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. ते दोघे एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत असून तिने या लंडनच्या ट्रीपच्या दरम्यान लेखक जॅफरी आर्चर यांची भेट घेतली. यावेळी ट्विंकलसोबत अक्षय कुमार देखील उपस्थित होता. 

ट्विंकलच्या लेखनाची भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांनी प्रशंसा केली आहे. पण तिच्या पतीने म्हणजेच अक्षयने ट्विंकलने लिहिलेले अद्याप एकही पुस्तक वाचले नसल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काल रात्री ट्विंकलच्या पजामा आर फॉरगिव्हिंग या पुस्तकाच्या एक लाख प्रती विकल्या गेल्या याचे सेलिब्रेशन आम्ही केले आणि तसेच जॅफरी आर्चर यांच्या केन अँड अ‍ॅबेल या पुस्तकाची 40 वी अ‍ॅनिव्हर्सरी देखील सेलिब्रेट केली. पण या सेलिब्रेशन पार्टीला मी केवळ इथून तिथून फिरत होतो. कारण मी ट्विंकलचे अद्याप एकही पुस्तक वाचलेले नाही. 

ट्विंकलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिच्या वाचकांचे आभार मानले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या सगळ्या वाचकांचे आभार मानते. मी लहान असताना एक वाचक म्हणून पुस्तकांमध्ये रममाण होत असे आणि आता वयाच्या चाळीशीत माझ्या पुस्तकांसोबत हा अनुभव लोकांना घेता यावा यासाठी प्रयत्न करत आहे. 

Web Title: Akshay Kumar Hasn't Read Twinkle Khanna's Books