Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:11 PM2020-09-09T13:11:24+5:302020-09-09T13:32:28+5:30

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधील सुपरस्टार्सपैकी एक आहे.

Akshay kumar birthday career flop films love life unknown interesting facts | Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार

Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधील  सुपरस्टार्सपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर त्याने 100 ते 200 कोटींचा गल्ला जमावला आहे. अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्‍यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने सुपरहिट चित्रपट देत आहे,आज अक्षय त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करतोय. मैं खिलाडी तू अनाडी, मोहरा, सबसे बडा खिलाडी, मिस्टक एंड मिसेज खिलाडी आणि खिलाडियों का खिलाडी असे अनेक हिट सिनेमा त्यांनी दिले आहेत. पण एक वेळ असा होता की त्याचे 16 चित्रपट सतत फ्लॉप झाले होते. 

अक्षयने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, ''आपल्या करिअरमधील कठीण काळातील आठवणी जागवताना तो म्हणाले माझे 16 सिनेमा फ्लॉप झाले होते त्यानंतर एक अभिनेता म्हणून माझं करिअर संपले असे मला वाटू लागले. मला हरल्या सारखं वाटत होते. त्यावेळी माझी मार्शल आर्टची ट्रेनिंग माझ्या कामी आली. त्याने मला नियमात राहणं शिकवले. 16 फ्लॉप झालेल्या सिनेमांनी देखील मला खूप काही शिकवले.'' 

 मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारला या वेबसीरीजसाठी ९० कोटी रूपये मानधन दिलं गेलं आहे. प्रोजेक्टशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, सुरूवातीला अक्षय डिजिटल सीरीजसाठी तयार नव्हता. पण अ‍ॅमेझॉनने त्याला फार मनवलं.

Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos

 

Web Title: Akshay kumar birthday career flop films love life unknown interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.