लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:47 AM2023-09-09T11:47:36+5:302023-09-09T11:50:44+5:30

विवाहित अक्षय कुमारचं प्रियाकां चोप्राबरोबर होतं अफेअर, ट्विंकल खन्नाला कळताच अभिनेत्रीने केलं असं काही की...

akshay kumar birthday actor had an extramarital affair with actress priyanka chopra wife twinkle khanna reacted | लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्...

लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्...

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे सिनेसृष्टीला दिले आहेत. अक्षय कुमारच्या अनेक हिट चित्रपटांपैकी ‘अंदाज’ आणि ‘ऐतराज’ हे सिनेमेही खूप गाजले. या सिनेमात अक्षयने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राबरोबर स्क्रीन शेअर केली होती. अक्षय आणि प्रियांकाची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सिनेमात अभिनय करता करता खऱ्या आयुष्यातही त्यांची जवळीक वाढत चालली होती.

सिनेइंडस्ट्रीमधील अफेअर्स हा कायमच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडमधील अनेक अफेअर्सपैकी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. विवाहित असूनही अक्षय कुमार प्रियांकाच्या प्रेमात पडला होता. २००३ साली प्रदर्शित झालेल्या अंदाज चित्रपटादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती. त्या दोघांच्या रिलेशनशिपबाबत बॉलिवूडमध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाल्या होत्या. याचदरम्यान अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला त्यांच्या या अफेअरबाबत माहीत पडलं. त्यानंतर त्यांच्यात भांडणही झालं होतं.

"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

अक्षय कुमारचं हे अफेअर ट्विंकल खन्नाच्या जिव्हारी लागलं होतं. संसार वाचवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी ट्विंकल खन्नाने अक्षयला प्रियांकाबरोबर कधीच काम न करण्याची सक्त ताकीदही दिली होती. त्यानंतर अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा पुन्हा कधीच ऑन स्क्रीन एकत्र दिसले नाहीत. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘वक्त : रेस अगेंस्ट टाइम’ या चित्रपटात अक्षय आणि प्रियांका शेवटचे एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी एकत्र कधीच काम केलं नाही.

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

केवळ प्रियांका चोप्राबरोबरच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर अक्षयचं नाव जोडलं गेलं होतं. लग्नाआधी शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, रेखा, सुश्मिता सेन, आयेशा झुलका या अभिनेत्रींबरोबर अक्षयच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अक्षयने २००१ साली अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर लग्न करत संसार थाटला होता. त्यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना आरव हा मुलगा आहे.

Web Title: akshay kumar birthday actor had an extramarital affair with actress priyanka chopra wife twinkle khanna reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.