मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’मधील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:57 IST2026-02-26T15:56:49+5:302026-02-26T15:57:22+5:30

‘भूत बंगला’मधील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज; १४ वर्षांनंतर परतला अक्षय-प्रियदर्शन यांचा तो जुना मॅडनेस!

akshay kumar bhoot bangala first song ram ji aake bhala karenge release | मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’मधील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज

मॅडनेसची धमाकेदार सुरुवात! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’मधील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज

‘भूत बंगला’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. कारण या चित्रपटातून अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची ओजी बॉलिवूड जोडी तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. उत्सुकतेला आणखी उधाण देत निर्मात्यांनी चित्रपटातील पहिलं गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज केलं आहे. हा एक हाय-स्पिरिटेड आणि पेपी ट्रॅक असून यात अक्षय कुमार त्याच्या एंटरटेनर मोडमध्ये दिसत आहेत. भन्नाटपणा, नॉस्टॅल्जिया आणि त्याची ट्रेडमार्क कॉमिक एनर्जी यांनी भरलेलं हे गाणं चित्रपटाच्या भन्नाट दुनियेची झलक दाखवतं.

कॉमिक एनर्जीने भरलेला हा ट्रॅक चित्रपटाचा मूड अचूक पकडतो. यात अक्षय कुमार त्याच्या क्लासिक अवतारात भुतांच्या विचित्र आणि मजेशीर जगात सहज वावरताना दिसत आहे. जिथे स्पूक्टॅक्युलर गोंधळ आणि कॉमिक फ्लेअरने भरलेला त्याचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हे गाणं प्रितम यांनी संगीतबद्ध केलं असून, गीतलेखन कुमार यांचं आहे. गायक अरमान मलिक आणि आरवन (देव अरिजीत) यांनी आपल्या आवाजाने गाण्याला रंगत आणली आहे. यामध्ये मेलो डी यांनी लिहिलेला आणि सादर केलेला रॅप सेगमेंट गाण्याला आधुनिक टच देतो.

बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स प्रस्तुत ‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शन प्रियदर्शन यांचं असून, निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी केली आहे.‘भूत बंगला’ हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : अक्षय कुमार की 'भूत बंगला' का गाना 'राम जी आके' रिलीज़!

Web Summary : अक्षय कुमार और प्रियदर्शन 'भूत बंगला' के साथ 14 साल बाद लौटे। पहला गाना 'राम जी आके' अक्षय का मनोरंजक अंदाज़ दिखाता है। तब्बू और परेश रावल अभिनीत फिल्म 10 अप्रैल, 2026 को रिलीज़ होगी।

Web Title : Akshay Kumar's 'Bhoot Bungla' kicks off with 'Ram Ji Aake' song!

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan reunite after 14 years in 'Bhoot Bungla.' The first song, 'Ram Ji Aake,' is a high-spirited, comic track showcasing Akshay's entertaining side. The film, also starring Tabu and Paresh Rawal, releases April 10, 2026.