जरा दमानं! सायकलिंग करताना धडकली ट्विंकल खन्ना अन् अक्षय कुमार हसतच सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:27 PM2024-01-02T20:27:54+5:302024-01-02T20:28:14+5:30

अक्षय आणि ट्विंकल हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत.

Akshay Kumar and Twinkle Khanna New Year Celebration Viral Video | जरा दमानं! सायकलिंग करताना धडकली ट्विंकल खन्ना अन् अक्षय कुमार हसतच सुटला

जरा दमानं! सायकलिंग करताना धडकली ट्विंकल खन्ना अन् अक्षय कुमार हसतच सुटला

खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील एक आवडते कपल आहे. अक्षय आणि ट्विंकल हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत. दोघांची फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे.  ट्विंकल च्या वाढदिवसानिमित्त दोघेही मालदीवमध्ये फिरायला गेले होते. तेव्हा तेथील त्यांचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत आले होते. मात्र, सध्या त्यांच्या एका व्हिडीओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं.  

 ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्विंकल सायकलिंग करताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक तिचा तोल जातो आणि सायकल एका खांबाला धडकते. हे सर्व पाहून अक्षय कुमार खळखळून हसायला लागतो आणि ट्विंकलही हसत असल्याचे दिसून येते.  शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांच्या संपुर्ण व्हॅकेशनचीही झलक पाहायला मिळत आहे. 

ट्विंकलनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'माझी सायकल खांबाला धडकणे सोडले तर, ही ट्रीप खूप छान अगदी खरोखरच स्वर्गात गेल्यासारखं वाटलं. तुमच्याकडे नवीन वर्षासाछी कोणतेही मोठे संकल्प असतील तर ते खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि इतरांना प्रेरणा द्या'. सध्या तिचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ट्विंकल खन्नाने नुकतेच तिचे चौथे पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज' लाँच केले आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर खिलाडी कुमार टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल 2024 प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

Web Title: Akshay Kumar and Twinkle Khanna New Year Celebration Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.