अक्षय कुमार आणि साजिद ऩडियाडवाल्याच्या हाऊसफुल 4चे डायलॉग लिहिणार हा सुपरहिट लेखक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:30 IST2017-12-22T08:00:27+5:302017-12-22T13:30:27+5:30
निर्माता साजिद नडियाडवाला आणि अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट हाऊसफुल 4 च्या तयारीला जोरात लागले आहेत. हाऊसफुल सिरीजच्या चौथा ...

अक्षय कुमार आणि साजिद ऩडियाडवाल्याच्या हाऊसफुल 4चे डायलॉग लिहिणार हा सुपरहिट लेखक !
न र्माता साजिद नडियाडवाला आणि अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट हाऊसफुल 4 च्या तयारीला जोरात लागले आहेत. हाऊसफुल सिरीजच्या चौथा चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात 2018 मध्ये सुरु होणार आहे. 2019 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय आणि साजिद एकत्र बसून चित्रपटाच्या पंच-लाईन्स तयार करण्याचे काम करतायेत. ऐवढेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि डायलॉग लिहिण्याचे काम प्रसिद्ध लेखक फरहाद समजी करणार आहे. आतापर्यंत फरहादने आपला भाऊ साजिद सोबत मिळून अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. हाऊसफुल सिरीजचा शेवटचा चित्रपट देखील साजिद- फरहादने मिळून दिग्दर्शित केला होता. आता दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले आहेत.
हाऊसफुल 4 हा पुनर्जन्माच्या कॉन्सेप्टवर आधारित असल्याचे कळतेयं. या चित्रपटाला साजिद नडियाडवाला मोठा स्तरावर तयार करायचा आहे. काही महिन्यांपूर्वी मीडियाशी बोलताना साजिदने सांगितले होते की हाऊसफुल 4 मध्ये हाऊसफुल सिरीजची सगळी पात्र असणार आहेत. याआधी हाऊसफुल सिरीजच्या दोन चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नडियाडवाल्यांने केले होते. यानंतर हाऊसफुल 3 च्या वेळी साजिद खान आणि साजिद नडियाडवाला यांच्यामध्ये मतभेद झाले. त्यानंतर साजिद खानने साजिद नडियाडवाल्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र आजही दोघे चांगले मित्र आहेत.
ALSO READ : Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!
अक्षयचा पॅडमॅन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा लाँच करण्यात आला आहे. पॅडमॅनमध्ये अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर असणार आहे. केवळ इतकेच नाही तर, या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट टिष्ट्वंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयची लव्ह इंट्रेस्ट असेल. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे.