अक्षय कुमारने सांगितले त्याच्या खास मैत्रिणीशिवाय, म्हटले हीच आहे माझी सगळ्यात पहिली मैत्रीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 15:00 IST2021-06-21T14:59:36+5:302021-06-21T15:00:15+5:30
अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या एका खास मैत्रिणीविषयी त्याच्या चाहत्यांना सांगितले असून ही मैत्रीण त्याच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

अक्षय कुमारने सांगितले त्याच्या खास मैत्रिणीशिवाय, म्हटले हीच आहे माझी सगळ्यात पहिली मैत्रीण
अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या एका खास मैत्रिणीविषयी त्याच्या चाहत्यांना सांगितले असून ही मैत्रीण त्याच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. तसेच या पोस्टद्वारे रक्षाबंधन या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याची देखील त्याने घोषणा केली आहे.
रक्षाबंधन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अलका हिरानंदानी आणि आनंद एल राय यांच्या सहकार्याने या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात येणार असून वितरण झी स्टुडिओज द्वारा करण्यात येणार आहे. हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित, आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित रक्षाबंधन फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शनचा चित्रपट आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देताना अक्षय कुमारने लिहिले आहे की, "जेव्हा मी आणि माझी बहीण अलका मोठे होत होतो तेव्हा ती माझी पहिली फ्रेंड होती आणि ती आमची अगदी नैसर्गिक मैत्री होती. आनंद एल राय यांचा रक्षाबंधन हा चित्रपट तिला समर्पित आहे आणि आमच्या भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव आहे. आज शूटिंगच्या पहिल्या दिवशी आपल्या प्रेमाची आणि शुभेच्छांची मला गरज आहे.