अक्षय कुमारलाही 'धुरंधर'ची धडकी? रणवीर सिंगच्या सिनेमामुळे 'भूत बंगला'चं प्रदर्शन लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:48 IST2025-12-31T12:45:50+5:302025-12-31T12:48:04+5:30
अक्षय कुमारने 'धुरंधर २'मुळे त्याच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. जाणून घ्या सविस्तर

अक्षय कुमारलाही 'धुरंधर'ची धडकी? रणवीर सिंगच्या सिनेमामुळे 'भूत बंगला'चं प्रदर्शन लांबणीवर
बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या एकामागून एक चित्रपट पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. मात्र नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत बंगला' (Bhoot Bangla) पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारण अभिनेता रणवीर सिंगचा 'धुरंधर २' हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण?
२०२५ हे वर्ष अक्षय कुमारसाठी संमिश्र राहिले आहे. त्याचे 'स्कायफोर्स', 'हाऊसफुल्ल ५' आणि 'जॉली एलएलबी ३' सारखे चित्रपट चर्चेत राहिले. अक्षयने याचवर्षी त्याच्या वाढदिवशी 'भूत बंगला' या चित्रपटाची घोषणा केली होती, ज्यामुळे चाहते खूप उत्सुक होते. सुरुवातीला हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता, पण नंतर त्याची तारीख २ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु आता 'धुरंधर २'मुळे अक्षयच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय.
BHOOT BANGLA - A MYSTICAL FANTASY SAGA ! 👻#AkshayKumar × #Priyadarshan Next Collaboration will be #BhootBangla Releasing On 2nd April 2026 (shall postpone) but not confirm yet.♦️#BB Official Announcement Of The Horror Comedy Drama Is Coming Tomm. 1st Jan On New Year 💯 pic.twitter.com/ChDXd9xxx2
— Shahabuddin Ahmed (SRKian) 2.0 🇮🇳 🇵🇸 (@Shahab2SRKian50) December 30, 2025
सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाने वादळ निर्माण केले आहे. या चित्रपटाने भारतात ७०० कोटींहून अधिक आणि जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशानंतर निर्मात्यांनी 'धुरंधर २' ची घोषणा केली असून, तो १९ मार्च २०२६ रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'धुरंधर २' च्या रिलीज डेटमुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होण्याची शक्यता आहे.
याच दिवशी यशचा 'टॉक्सिक' चित्रपटही येणार आहे. यापूर्वी अजय देवगणनेचा 'धमाल ४' चित्रपट सुद्धा याच दिवशी येणार होता. परंतु अजयने मात्र बॉक्स ऑफिसवरील ही टक्कर टाळली असून त्याचा या शर्यतीतून बाजूला केला आहे. आता अक्षय कुमारनेही कोणतीही रिस्क न घेता 'भूत बंगला' ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा विचार सुरू केला आहे. 'धुरंधर २'च्या वादळात अक्षयला स्वतःच्या सिनेमाचं नुकसान करायचं नाहीये, म्हणून त्याने 'भूत बंगला'ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी तब्बल १४ वर्षांनंतर एकत्र येत असल्याने 'भूत बंगला' सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.