'गोलमाल ५'मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री, अजय देवगणशी टक्कर; कधी प्रदर्शित होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:26 IST2026-03-09T12:25:54+5:302026-03-09T12:26:18+5:30
रोहित शेट्टीचा सर्वात मोठा धमाका! 'गोलमाल ५' मध्ये अक्षय कुमार साकारणार व्हिलन; अजय देवगणसोबत होणार 'टॉम अँड जेरी' स्टाईल फाईट

'गोलमाल ५'मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री, अजय देवगणशी टक्कर; कधी प्रदर्शित होणार?
Akshay Kumar in Golmal 5 : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या 'भूत बांगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शेट्टीच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'गोलमाल' फ्रँचायझीच्या पाचव्या भागात अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अक्षय कुमार नायकाच्या नाही, तर एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, 'गोलमाल ५' मध्ये अक्षय कुमार आणि अजय देवगण यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 'सूर्यवंशी' आणि 'सिम्बा'मध्ये या दोघांनी एकत्र कॅमिओ केले होते. मात्र, या चित्रपटात ते पूर्ण वेळ एकत्र दिसतील. या दोघांचे समीकरण पडद्यावर 'टॉम अँड जेरी'सारखे विनोदी आणि खोडकर असणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटासाठी सुमारे १८ दिवस शुटिंग करणार असल्याची माहिती आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि शर्मन जोशी हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. रोहित शेट्टीने जेव्हा अक्षयला या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा अक्षयने क्षणाचाही विलंब न लावता या भूमिकेसाठी होकार दिला.
२०२७ मध्ये होणार प्रदर्शित?
अक्षय कुमारच्या एन्ट्री 'गोलमाल ५' ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अक्षय आणि अजय देवगणला एकत्र पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.