अक्षय कुमारची अभिनेत्री राहते अमिताभ बच्चन यांच्या घरात; महिन्याला देते इतके भाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:31 IST2023-01-23T17:25:25+5:302023-01-23T17:31:02+5:30
Amitabh Bachchan House Rent: अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी भागात असलेल्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये भाड्याने राहते आहे.

अक्षय कुमारची अभिनेत्री राहते अमिताभ बच्चन यांच्या घरात; महिन्याला देते इतके भाडे
Amitabh Bachchan Rents His Duplex Flat : अमिताभ बच्चन यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये केली जाते. काही काळापूर्वी त्यांनी बँकेला एक प्रॉपर्टी दिली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांना या प्रॉपर्टीचे लाखोंमध्ये भाडे मिळायचे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुंबईसह देश-विदेशात कोट्यवधींची संपत्ती (property) आहे. त्यांचा अंधेरी येथे डुप्लेक्स फ्लॅटही आहे. जो त्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीला भाड्याने दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी दोन वर्षांचा करारही केला आहे. ही अभिनेत्री आहे क्रिती सेनॉनने (kriti sanon).
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी 31 कोटींना डुप्लेक्स आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हे डुप्लेक्स मुंबईतील अंधेरी भागात आहे.
मनीकंट्रोल.कॉमच्या रिपोर्टनुसार, क्रिती सेनॉनचा (kriti sanon) हा भाडे करार ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीसाठी आहे. या फ्लॅटसाठी क्रिती सेनॉनने (kriti sanon) ६० लाख रुपये डिपॉजिट दिले आहेत. या फ्लॅटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 26 आणि 27व्या मजल्यावर हा फ्लॉट आहे. अभिनेत्री क्रिती महिन्याला 10 लाख रुपये भाडे देते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर क्रिती लवकरच लवकरच 'आदिपुरुष', 'बच्चन पांडे', 'भेडिया', 'गणपत', 'हम दो हमारे दो' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.