​या कारणामुळे अक्षय खन्नाने आजवर केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 09:34 AM2017-10-31T09:34:04+5:302017-10-31T15:04:04+5:30

हिमालयपुत्र या चित्रपटाद्वारे अक्षय खन्नाने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बॉर्डर या चित्रपटातील त्याची भूमिका तर चांगलीच गाजली होती. त्यानंतर ...

Akshay Khanna has not been married for this reason | ​या कारणामुळे अक्षय खन्नाने आजवर केले नाही लग्न

​या कारणामुळे अक्षय खन्नाने आजवर केले नाही लग्न

googlenewsNext
मालयपुत्र या चित्रपटाद्वारे अक्षय खन्नाने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बॉर्डर या चित्रपटातील त्याची भूमिका तर चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याने हंगामा, हलचल, दिल चाहता है, हमराज, रेस यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्याच्या आजवरच्या भूमिकांसाठी त्याला खूप सारे पुरस्कार देखील मिळाले आहेत. बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर त्याला मानले जाते. त्यामुळे अक्षय लग्न कधी करणार हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे. पण अक्षय कधी लग्न करेल याची चिन्हं काही दिसत नाहीत. अक्षयनेच मी कधीच लग्न करणार नाही असे म्हटले आहे आणि एवढेच नव्हे तर आजवर त्याने लग्न का केले नाही याचे उत्तर देखील एका मुलाखतीत दिले आहे. 
अक्षयने त्याच्या मुलाखतीत म्हटले होते की, कोणतेही नाते हे अनेक वर्षं टिकून राहाते असे म्हटले जाते. पण मला त्या गोष्टीवर विश्वासच नाहीये. त्यामुळे काही काळासाठी एकत्र राहावे आणि त्यानंतर आपापल्या आयुष्यात निघून जावे ही गोष्ट मला जास्त पटते. लग्न म्हटले की, कमिटमेंट देणे हे आलेच, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून न राहाता मला माझे जीवन एकटे जगायचे आहे. मी कोणासोबतही काही काळासाठी नात्यात राहू शकतो. पण नाते आयुष्यभर टिकवण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. दोन व्यक्ती नात्यात असताना ते जोपर्यंत ते त्यांच्या आयुष्यात खूश आहेत, तोपर्यंतच त्यांनी त्या नात्यात राहावे. एकमेकांसोबत आनंदी नसताना राहाणे हे खूपच चूकीचे आहे असे मला वाटते. जर तुम्ही नात्यात खूश नसाल तर नात्यातील चांगल्या वळणावरच वेगळे होणे हे चांगले.  
अक्षय खन्नाचा इत्तफाक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असून सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा ही रहस्यमय असल्याने या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Also Read : बॉर्डर या चित्रपटातील धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड

Web Title: Akshay Khanna has not been married for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.