'जॉली एलएलबी ३' बद्दल अक्षयने दिलं मोठं अपडेट, कधी येतोय चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:37 IST2025-06-19T17:36:24+5:302025-06-19T17:37:06+5:30
'हाऊसफुल ५'नंतर अक्षय कुमार 'जॉली एलएलबी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'जॉली एलएलबी ३' बद्दल अक्षयने दिलं मोठं अपडेट, कधी येतोय चित्रपट?
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या 'हाऊसफुल ५' (Housefull 5) चित्रपटामुळे चर्चेत आहे. थिएटरमध्ये सिनेमा चांगली कामगिरी करत आहे. 'हाऊसफुल ५'नंतर अक्षय कुमार 'जॉली एलएलबी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अर्शद वारसीही दिसणार आहे. 'जॉली एलएलबी ३'चे चित्रीकरण पूर्ण झालं आहे. आता अलीकडेच अक्षयने या कोर्टरूम ड्रामा चित्रपटाबद्दल एक मोठं अपडेट दिले आहे.
अक्षयने नुकतंच पिंकव्हिलाशी संवाद साधला. 'जॉली एलएलबी ३'बद्दल विचारले असता तो म्हणाला, '''जॉली एलएलबी'चा पहिला आणि दुसरा भाग दोन्ही खऱ्या घटनांवर आधारित होते. त्यामुळे त्याचा तिसरा भागही खऱ्या घटनेवर आधारित असेल. "तुम्हाला आणखी काय हवे आहे, मी तुम्हाला चित्रपटाची संपूर्ण कथा आत्ताच सांगावी?", असं तो हसत म्हणाला.
अक्षयने अर्शद वारसीसोबत काम करण्याचा अनुभवही अक्षयनं शेअर केला. तो म्हणाला, "या चित्रपटात मी आणि अर्शद वारसी एकत्र येत आहोत. म्हणजे जॉली वन आणि जॉली २ एकत्र येत आहेत. मला अर्शदसोबत काम करायला खूप मजा आली. तो खूप चांगला माणूस आहे. त्याची विनोदबुद्धी अद्भुत आहे".
अक्षयने चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, "मी त्याच्या लेखनशैलीचा चाहता आहे. म्हणूनच त्यांनी हा चित्रपट सुमारे अडीच महिन्यांत पूर्ण केला". सुभाष यांनी पहिला आणि दुसरा भाग लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. आता 'जॉली एलएलबी ३'मध्ये अक्षय आणि अर्शद एकत्र दिसणार आहेत. रिपोर्टनुसार हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर हे देखील दिसतील.