धक्कादायक! अभिनेता नागार्जुनच्या फार्म हाऊसमध्ये सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:02 IST2019-09-19T17:55:24+5:302019-09-19T18:02:34+5:30
नागार्जुनने जैविक शेतीसाठी फार्मचा सर्वे करण्यासाठी एका व्यक्तिला पाठवले होते.

धक्कादायक! अभिनेता नागार्जुनच्या फार्म हाऊसमध्ये सापडला मृतदेह
तेलगू सुपरस्टार नागार्जुनच्या फॉर्म हाऊस गेल्या बुधवारी एक अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सापडला आहे. नागार्जुनने जैविक शेतीसाठी फार्मचा सर्वे करण्यासाठी एका व्यक्तिला पाठवले होते. मात्र त्या अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सापडला आहे.
नागार्जुनच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे हा फार्म भंगार स्थितीत आलायं. आपल्या पत्नीसोबत नागार्जुनने मिळून याठिकाणी काही झाडं लावली होती. तपास करताना या व्यक्तिचा मृतदेह हा याठिकाणी सहा महिन्यापेक्षा जास्तकाळ पडून असल्याची माहिती समोर आली. मृतदेहच्या ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
नागार्जुनकडे असलेल्या संपत्तीबाबत बोलायचं झाले तर त्याच्याकडे जवळपास 3000 कोटींची संपती आहे. तो अन्नपूर्णा स्टुडिओ प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. हा स्टुडिओ सुमारे ७ एकरच्या आवारात पसरलेला आहे. हैदराबादेतील अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ फिल्म अँड मीडियाचा तो अध्यक्ष आहे. याशिवाय एमएनएन रियलिटी इंटरप्राइजेजचा फाऊंडिग पार्टनर देखील आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत.
नागार्जुन तेलगू बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार होता. मात्र हा शो सुरु होण्यापूर्वीच वादात सापडला. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरोधात शोमध्ये सहभागी होणाऱ्या दोन महिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. यामुळे या शोचे मेकर्स आणि बरोबर होस्ट नागार्जुनपण चिंतेत होता.