​अक्षयवर भाळली ही अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 09:25 IST2016-10-31T17:06:20+5:302016-11-01T09:25:55+5:30

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारवर प्रेम करणाऱ्यांची कमतरता नाही. पण बॉलिवूडमधल्या नट्या अक्षयवर मरायला लागल्या तर  Twinkleची (अक्षयची पत्नी हो!) ...

Akhanyabala act of the actress! | ​अक्षयवर भाळली ही अभिनेत्री!

​अक्षयवर भाळली ही अभिनेत्री!

लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारवर प्रेम करणाऱ्यांची कमतरता नाही. पण बॉलिवूडमधल्या नट्या अक्षयवर मरायला लागल्या तर  Twinkleची (अक्षयची पत्नी हो!) चिंता वाढणे साहजिक आहे.  आम्ही बोलतोय ते तापसी पन्नूबद्दल. अक्षयला सेटवर अ‍ॅक्शन स्टंट करताना पाहून तापसी अक्षरश: त्याच्या प्रेमातच पडली. 

होय, तापसी व अक्षय कुमार ही जोडी यापूर्वी ‘बेबी’मध्ये दिसली होती. आता ‘बेबी’चा सीक्वेल ‘नाम शबाना’ येतो आहे. या चित्रपटात तापसी लीड रोलमध्ये आहे आणि अक्षय गेस्ट अपिअरेंस करताना दिसणार आहे. अलीकडे तापसी व अक्षय यांनी ‘नाम शबाना’चे मलेशियातील शूटींग शेड्यूल पूर्ण केले.

या शेड्यूलमध्ये अक्षयला काही अ‍ॅक्शन दृश्ये द्यायची होती. अक्षय अ‍ॅक्शन सीन्स देत होत आणि तापसी अक्षरश: त्याला पाहताना स्वत:ला हरवून गेली होती. अक्षयला डोळ्यांपुढे अ‍ॅक्शन करताना पाहणे एक विलक्षण अनुभव होता, असे तापसी म्हणाली. आता तापसीही ही प्रतिक्रिया पाहून Twinkle ला सावध होण्याची गरज आहेच. आता Twinkle आपल्या नव-याला कशी सांभाळते, ते बघूच!

Akshay Tapsee

 ‘नाम शबाना’ येत्या वर्षात रिलीज होत आहे. यात अक्षय व तापसीशिवाय मनोज वाजपेयी, दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. अक्षय सध्या एकापाठोपाठ एक असे चित्रपट करत सुटला आहे. अलीकडे त्याने ‘जॉली एलएलबी2’चे शूटींग संपवले. यात तो एका वकीलाची भूमिका साकारतो आहे. 

 

Web Title: Akhanyabala act of the actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.