शिवसोबत काम करायला आवडेल का? आकाश ठोसर म्हणाला, 'आम्ही एकत्र...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:41 IST2023-04-13T15:40:00+5:302023-04-13T15:41:51+5:30

दोघांची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

akash thosar says he would like to work with shiv thakare both knows each other | शिवसोबत काम करायला आवडेल का? आकाश ठोसर म्हणाला, 'आम्ही एकत्र...'

शिवसोबत काम करायला आवडेल का? आकाश ठोसर म्हणाला, 'आम्ही एकत्र...'

'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसरचा (Akash Thosar) 'घर बंदुक बिरयानी' सिनेमा नुकताच रिलीज झाला. नागराज मंजुळेंच्या या सिनेमात आकाशने मुख्य भूमिका साकारली. चित्रपटात आकाशचा लुकही खूपच हटके होता. महाराष्ट्रात जशी आकाश ठोसरची क्रेझ आहे तशीच बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेचीही (Shiv Thakare) प्रचंड क्रेझ आहे. या दोन्ही कलाकारांना एकत्र बघणं तर चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

अभिनेता आकाश ठोसरने नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. 'शिव  ठाकरे आणि तू मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेतले चेहरे आहात. तुला शिव ठाकरेबरोबर काम करायला आवडेल का?' असा प्रश्न आकाशला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर आकाश म्हणाला, 'शिव आणि मी एकदा भेटलो होतो. आम्ही एकत्र मॅच बघायला गेलो होतो. तेव्हा आमची ओळख झाली. मला त्याच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल.

शिव आणि आकाशला एकत्र बघण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार. दोघांची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे हे दोघं जर सिनेमा किंवा कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले तर नक्कीच प्रोजेक्ट हिट होईल.

Web Title: akash thosar says he would like to work with shiv thakare both knows each other