"जाड इंजेक्शन, आयव्ही ड्रीप, सर्जरी...", आलिया भटच्या मैत्रिणीने eggs फ्रीज केले; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:13 IST2026-03-09T11:13:08+5:302026-03-09T11:13:44+5:30
गेले दोन आठवडे खूप..., अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

"जाड इंजेक्शन, आयव्ही ड्रीप, सर्जरी...", आलिया भटच्या मैत्रिणीने eggs फ्रीज केले; म्हणाली...
आजकाल अनेक महिला वय वाढत चालले असल्याने eggs फ्रीज करण्याचा पर्याय निवडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेने याबद्दल खुलासा केला होता. त्याआधी बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर डेजी शाहनेही eggs फ्रीज केल्याचं सांगितलं होतं. प्रियंका चोप्रानेही काही वर्षांपूर्वी वयाच्या तिशीतच हा पर्याय अवलंबला होता. तर काल महिला दिनाला आलिया भटची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने eggs फ्रीज केले. हा निर्णय का घेतला आणि ही प्रक्रिया किती वेदनादायक होती याबद्दल तिने सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
आकांक्षाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती जिम वियरमध्ये असून पुन्हा कामावर परतल्याचे सूचित करत आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने या प्रक्रियेतील कठीण प्रसंगांचे वर्णन केले. तिने सांगितले की एग्स फ्रीझ करण्याच्या या दोन आठवड्यांच्या प्रवासात तिला दररोज स्वतःला इंजेक्शन टोचून घेणे, हार्मोन्सचे बदल, शरीराला आलेली सूज (Bloating), मूड स्विंग्स आणि सततच्या वैद्यकीय चाचण्यांचा सामना करावा लागला.
आपल्या भावना व्यक्त करताना आकांक्षाने लिहिले, "खरे तर मी हे कोणासोबत शेअर करायचे ठरवले नव्हते, पण आजचा दिवस (महिला दिन) हे सांगण्यासाठी अगदी योग्य वाटत आहे. स्त्रियांचे शरीर खरोखरच विलक्षण आहे. गेल्या दोन आठवड्यांत मी दररोज इंजेक्शन, आयव्ही ड्रिप्स आणि शेवटी सर्जरी या प्रक्रियेतून गेले. पण महिलांचे शरीर किती शक्तिशाली असू शकते आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात कशी असते, हे पाहून मी थक्क झाले आहे."
तिने पुढे असेही नमूद केले की, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती आता पुन्हा आपल्या कामाच्या दिनचर्येत परतत आहे. जरी तिला सध्या केवळ २० मिनिटे चालणेही कठीण जात असले, तरी आपल्या शरीराने जे काही साध्य केले आहे, त्याचा तिला अभिमान वाटतो. आकांक्षाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
आकांक्षा रंजन कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'ग्राम चिकित्सालय' या प्राइम व्हिडिओच्या वेब सीरिजमध्ये झळकली होती. ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या संघर्षावर आधारित या मालिकेत तिने 'डॉक्टर गार्गी'ची भूमिका साकारली होती. याशिवाय आलिया भट्टच्या 'जिगरा' या चित्रपटातही तिने कॅमिओ भूमिका केली होती.