अजय-काजोलने सिंगापूरमध्ये घेतले नवं घर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 08:00 IST1970-01-01T06:03:38+5:302018-11-01T08:00:00+5:30
गेल्या काही दिवसांपासून काजोल आणि अजय त्यांचा नवा आशियाना सिंगापूरमध्ये शोधत होते. आता तुम्हाला प्रश्न पडले की अजय आणि काजोल भारतसोडून सिंगापूरमध्ये शिफ्ट होतायेत.

अजय-काजोलने सिंगापूरमध्ये घेतले नवं घर, वाचा सविस्तर
गेल्या काही दिवसांपासून काजोल आणि अजय त्यांचा नवा आशियाना सिंगापूरमध्ये शोधत होते. आता तुम्हाला प्रश्न पडले की अजय आणि काजोल भारतसोडून सिंगापूरमध्ये शिफ्ट होतायेत का?, तर तस अजिबात नाही आहे. काजोल-अजयची मुलगी न्यासा सिंगापूरमध्ये राहते आहे.
सिंगापूरमधली युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशियामध्ये न्यासा शिकत आहे. न्यासा शिकत असलेल्या शाळेचं स्वतंत्र हॉस्टेल आहे. मात्र न्यासाला हॉस्टेलमध्ये राहायचे नाही तिला स्वंतत्र राहायचे आहे. त्यामुळे अजय-काजोलने तिच्यासाठी सिंगापूरमधील एका उच्चभ्रू वस्तीत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले असल्याचे समजतेय. जानेवारी २०१९ पर्यंत न्यासा या घरात शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अजयच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर लवकरच तो टोटल धमालमध्ये दिसणार आहे. ‘टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसह माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहे. तर सोनाक्षी फक्त या गाण्यापुरती सिनेमात झळकणार आहे.१९७१ साली प्रदर्शित झालेल्या राज एन सिप्पी यांच्या 'इनकार' या सिनेमातील 'मुंगडा' गाण्याचे रिमेक या सिनेमात दिसणार आहे. वारसी, बोमन इराणी आणि संजय मिश्रा यांच्या भूमिका आहेत.