अजयला कामापुढे सुचेना काही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 22:07 IST2016-04-18T16:37:36+5:302016-04-18T22:07:36+5:30
अजय देवगण आपला आगामी चित्रपट ‘शिवाय’च्या चित्रीकरणात व्यक्त आहे. बल्गेरियाच्या बर्फाळ पहाडांवर याचे शूटींग सुरु आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ...

अजयला कामापुढे सुचेना काही!!
अ य देवगण आपला आगामी चित्रपट ‘शिवाय’च्या चित्रीकरणात व्यक्त आहे. बल्गेरियाच्या बर्फाळ पहाडांवर याचे शूटींग सुरु आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे २९१४ मीटर उंचीवरील हे चित्रीकरण म्हणजे अजयसह संपूर्ण टीमसाठी आव्हान होते. हिमवृष्टी आणि गोठवून टाकणाºया थंडीने सगळ्यांना हैरान करून सोडले होते. याचदरम्यान अजयला हिपोथेरमीयाने ग्रासले. अशास्थितीत डॉक्टरांनी अजयला दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र कसला आराम नि कसले काय, कामापुढे काहीही नाही. अजय केवळ अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर शूटसाठी परतला. १९ डिग्री सेल्सिअस तापमानात त्याने काही अॅक्शनदृश्ये दिलीत. चित्रपटाचे संपूर्ण युनिटने गोठवणाºया थंडीपासून बचावासाठी जाडेभरडे वूलन कोट घातले होते. मात्र अजय केवळ एक टीशर्ट आणि जॅकेटमध्ये होता. याहीस्थितीत अजयने नॉनस्टॉप हेलिकाप्टर शूट केले आणि काम संपल्यावरच स्वस्थ बसला. मान गयें बॉस...पण अजय, वेल डन!!
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}When the going gets tough, tough get going! Heartfelt thanks to fantastic TeamShivaay for an Extreme Bulgaria shoot.https://t.co/8W7D1n7RKo— Ajay Devgn (@ajaydevgn) 18 April 2016