‘राजनीति’च्या सिक्वलमधून अजयला डच्चू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 09:20 IST2016-02-29T16:20:38+5:302016-02-29T09:20:38+5:30
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा आपल्या ‘राजनीति’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत. मात्र या सिक्वलमध्ये अजय देवगन नसणार ...

‘राजनीति’च्या सिक्वलमधून अजयला डच्चू!
ब लिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा आपल्या ‘राजनीति’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत. मात्र या सिक्वलमध्ये अजय देवगन नसणार असल्याचे कळते. २०१० मध्ये अजय, अर्जून रामपाल, मनोज वाजपेयी, कॅटरिना कैफ व नाना पाटेकर यांना घेऊन झा यांनी ‘राजनीति’ बनवला होता. याच्या पुढच्या सिक्वलमध्ये अजय नसेल, हे जवळजवळ पक्के झाले आहे. २०१० मध्ये महाभारतातील चरित्र डोळ्यासमोर ठेवून मी ‘राजनीति’ बनवला होता. तेव्हा राजकीय स्थिती काही वेगळी होती. आज देशाचे राजकारण वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळेच नव्या सिक्वलसाठी मी नवी कहाणी लिहित आहे, असे झा यांनी सांगितले.