अजय देवगण घेऊन येतोयं मराठी चित्रपट; मुख्य भूमिकेत दिसणार नाना पाटेकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:46 IST2017-03-15T07:16:00+5:302017-03-15T12:46:00+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या मराठीचा बोलबाला आहे. होय, अनेक बडे बॉलिवूड स्टार्स मराठी चित्रपट करण्यास उत्सूक आहेत. काहींनी मराठी चित्रपटांची निर्मिती ...

अजय देवगण घेऊन येतोयं मराठी चित्रपट; मुख्य भूमिकेत दिसणार नाना पाटेकर!
ब लिवूडमध्ये सध्या मराठीचा बोलबाला आहे. होय, अनेक बडे बॉलिवूड स्टार्स मराठी चित्रपट करण्यास उत्सूक आहेत. काहींनी मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास पसंती दिली आहे. तर काही जण मराठी चित्रपटांचा हिंदी रिमेक बनण्यास उत्सूक आहेत. एकंदर काय, तर सध्या बॉलिवूडकरांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आहे. अभिनेता अजय देवगण हाही अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक़ मराठी सिने इंडस्ट्रीत निर्माता म्हणून एन्ट्री घेणाºया अजयने ‘विटी दांडू’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. पण म्हणून अजय नाऊमेद झाला नाही. अजय देवगन आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे आणि विशेष म्हणजे, यात अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहे.
ALSO READ : अजयने का निवडली अक्षयची वाट?
अजयचा नवा मराठी सिनेमा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात नाना पाटेकर एका आगळ्या-वेगळ्या अंदाजात तुम्हा-आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरणार असल्याची माहिती आहे. अजय देवगनसोबतच खुद्द नाना आणि अभिनव शुक्ला हेही या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर मराठीतील प्रतिभावंत दिग्दर्शक सतीश राजवाडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा जिम्मा सांभाळणार आहेत. निश्चितपणे नानासोबत मराठीतील आणखी काही लोकप्रीय कलाकारांची या चित्रपटात वर्णी लागणार. तूर्तास हे कलाकार कोण हे गुलदस्त्यात आहे. अजय देवगन आणि नाना पाटेकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र कामे केली आहे. ‘भूत’, ‘अपहरण’, ‘राजनिती’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र कामे केली आहेत. आता ही जोडी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.