​ अजय देवगणच्या आईची प्रकृती गंभीर; आयसीयूमध्ये भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:25 IST2017-01-24T09:55:23+5:302017-01-24T15:25:23+5:30

अभिनेता अजय देवगण याची आई वीना देवगण यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळलेत. यामुळे त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात ...

Ajay Devgn's mother is serious; ICU recruitment | ​ अजय देवगणच्या आईची प्रकृती गंभीर; आयसीयूमध्ये भरती

​ अजय देवगणच्या आईची प्रकृती गंभीर; आयसीयूमध्ये भरती

िनेता अजय देवगण याची आई वीना देवगण यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळलेत. यामुळे त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. आईची प्रकृती नाजूक असल्याची बातमी मिळताच अजय शूटींग अर्धवट सोडून मुंबईत परतला आहे. सध्या अजय ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 
दोन चार दिवसांपूर्वीच अजयच्या आईला रूग्णालयातून सुटी मिळाली होती. त्यामुळे  गत शनिवारी अजय शूटींगला रवाना झाला होता. पण शूटींग सुरु होत नाही तोच  वीना यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची बातमी अजयला कळली. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. वीना यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्याचे कळतेय. सध्या वीना यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून अजय आपल्या आईसोबत रूग्णालयातच आहे. आई पूर्णपणे बरी झाल्यानंतरच शूटींगवर परतण्याचा निर्णय त्याने घेतलाय. एका चार्टड प्लेनने अजय मुंबईत दाखल झाला आणि मुंबई विमानतळावरून थेट रूग्णालयात पोहोचला.



अजय आपल्या आई-वडिलांच्या अतिशय जवळ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय अजय घराबाहेर पाऊलदेखील टाकत नाही. मुंबईत असतो तेव्हा आई-बाबांचा आशीर्वाद घेऊनच तो घराबाहेर पडतो. आऊटडोअर शूटींग असले तर फोनवरून आई-बाबांचा आशीर्वाद घ्यायला तो विसरत नाही. याच कारणाने आईची प्रकृती पुन्हा बिघडल्याचे कळताच अजयने तडक मुंबई गाठली.
जयपूर येथे ‘बादशाहो’चे शूटींग सुरु आहे. मिलन लुथरियाचा हा चित्रपट आणीबाणीदरम्यानच्या एका घटनाक्रमावर आधारित आहे. इमरान हाश्मी आणि इशा गुप्ता यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Related stories : अजय देवगन दिसेल या पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत!
‘एक्स्पेंडेबल्स’चा हिंदी रिमेक ; सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, सनी देओल येणार एकत्र?

Web Title: Ajay Devgn's mother is serious; ICU recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.