रशियन बॉयफ्रेन्डसोबत लग्नबंधनात अडकणार अजय देवगणची ‘ही’ हिरोईन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:13 IST2018-02-06T09:43:35+5:302018-02-06T15:13:35+5:30
अनुष्का शर्मापाठोपाठ बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, ही अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम ...

रशियन बॉयफ्रेन्डसोबत लग्नबंधनात अडकणार अजय देवगणची ‘ही’ हिरोईन!
अ ुष्का शर्मापाठोपाठ बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. होय, ही अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सूुरू आहे. अशात श्रियाने सुद्धा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मार्चमध्ये श्रिया तिचा रशियन बॉयफ्रेन्डसोबत साता जन्माच्या गाठी बांधणार आहे. सध्या श्रिया तिच्या बॉयफ्रेन्डच्या पालकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रियाच्या लग्नासाठी मार्चचा मुहूर्त ठरला आहे. राजस्थानात अगदी राजेशाही थाटात हा विवाह सोहळा होणार आहे. तूर्तास श्रियाच्या लग्नाबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे. श्रियाच्या या रशियन बॉयफ्रेन्डचे नावही अद्याप गुलदस्त्यात आहे.अलीकडे एका मुलाखतीत श्रिया लग्नाबद्दल बोलली होती. मी लवकरात लवकर लग्न करावे, यासाठी माझ्यावर दबाव आहे. अर्थात हा दबाव माझ्या काळजी व प्रेमापोटी आहे, असे श्रिया एका मुलाखतीत म्हणाली होती.
श्रिया ही साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. बॉलिवूडमध्येही ती दिसली आहे. ‘दृश्यम’ या चित्रपटात ती अजय देवगणसोबत दिसली होती. त्यापूर्वी अजयसोबतच ‘सिंघम’मध्ये ती दिसली होती. या चित्रपटाने श्रियाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती. यातील तिच्या अभिनयाचेही बरेच कौतुक झाले होते. ‘जिला गाजियाबाद’, ‘गली गली में चोर है’ या चित्रपटातही श्रियाने काम केले होते.
ALSO READ : या अभिनेत्री साउथमध्ये हिट; बॉलिवूडमध्ये मात्र फ्लॉप
‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता.