2018 च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार अजय देवगणचा हा जबरदस्त चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 13:36 IST2017-11-14T08:06:50+5:302017-11-14T13:36:50+5:30
अजय देवगणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. पुढच्या वर्षी अजय देवगण दसऱ्याच्या मुहूर्तावर एक चित्रपट घेऊन येतो आहे. आकिव ...
.jpg)
2018 च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार अजय देवगणचा हा जबरदस्त चित्रपट
अ य देवगणच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. पुढच्या वर्षी अजय देवगण दसऱ्याच्या मुहूर्तावर एक चित्रपट घेऊन येतो आहे. आकिव अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज झालेला वरुण धवनचा जुडवा 2 चित्रपट सुपरहिट गेला होता. कारण दिवाळी आणि ईदच्या दिवशी अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. याच कारणामुळे अजय देवगणने दसऱ्याच्या मुहूर्ताची निवड केली असेल.
या चित्रपट अजय देवगणसह तब्बू सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट एका अरबन लव्ह स्टोरीवर आधारित आहे. अजय आणि तब्बूची जोडी नुकतीच प्रेक्षकांनी गोलमाल अगेनमध्ये बघितली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गेला त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फक्त अजय देवगण नाही तर विद्युत जामवालसुद्धा आपला चित्रपट दसऱ्याच्या दिवशी रिलीज करणार आहे. विद्युतच्या चित्रपटाचे नाव जंगली आहे.विद्युत आणि अजयने बादशाहो चित्रपटात एकत्र काम केले आहे. विद्युतच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर तो एक एक्शन चित्रपट असणार आहे. हॉलिवूडचा दिग्दर्शक रसेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आता हे बघणं उत्सुकतेचे ठरेल की प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंती देतायेत.
अजय देवगणने राजकुमार गुप्ताचा आगामी चित्रपट रेडचे शूटिंग सुरु केले आहे. ज्यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूज दिसणार आहे. यात अजय एका इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारतो आहे. 16 मार्च 2018 ला रिलीज होणार आहे.
ALSO READ : अडचणीत असलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आला अजय देवगण, वाचा सविस्तर!
कारण काजोल आणि अजय देवगण यांना एकत्रित चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने विचारले होते आणि त्याने त्याच्या चित्रपटाची कथा देखील अजयला आणि काजोलला ऐकवली होती. ही कथा काजोलला आवडली असल्याचे म्हटले जाते. पण अजयला सध्या काजोलसोबत काम करायचे नाहीये आणि त्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काजोल आणि अजयला पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र पाहाण्यासाठी त्यांच्या फॅन्सना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.