अजय देवगणचा ‘बादशाहो’ फ्लॉप होण्यामागे होता ‘या’ व्यक्तीचा हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:02 IST2017-10-17T06:32:25+5:302017-10-17T12:02:25+5:30

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘गोलमाल अगेन’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अजय ‘गोलमाल अगेन’सह धमाका करण्यास तयार आहे. ...

Ajay Devgn's 'Badshaho' was flop, the person's hand! | अजय देवगणचा ‘बादशाहो’ फ्लॉप होण्यामागे होता ‘या’ व्यक्तीचा हात!

अजय देवगणचा ‘बादशाहो’ फ्लॉप होण्यामागे होता ‘या’ व्यक्तीचा हात!

लिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘गोलमाल अगेन’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अजय ‘गोलमाल अगेन’सह धमाका करण्यास तयार आहे. पण ‘गोलमाल अगेन’ची चर्चा असताना अजयचा याआधीचा चित्रपट ‘बादशाहो’ सुद्धा चर्चेत आला आहे. ‘बादशाहो’ याचवर्षी अतिशय दणक्यात रिलीज झाला होता. पण सुरुवात जितकी दणक्यात झाली, तितक्याच दणकून हा चित्रपट आपटला. मिलन लुथरिया यांनी ‘बादशाहो’ दिग्दर्शित केला होता. खरे तर मिलन लुथरियासोबत अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. त्यामुळे मिलन अन् अजय या ‘सुपरहिट’ जोडींचा ‘बादशाहो’ सुद्धा सुपरहिट होणार, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण असे न होता चित्रपट सुपरफ्लॉप झाला. अजय देवगणच्या चित्रपटात असतो तो सगळा मसाला ‘बादशाहो’ होता. तरिही हा चित्रपट का फ्लॉप झाला असावा, हाच प्रश्न अनेकांना यानंतर पडला होता. अखेर इतक्या दिवसांनंतर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.



होय, खुद्द अजय देवगणने चित्रपटाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘डिएनए’ला दिलेल्या एका मुलाखतीत अजयने ‘बादशाहो’ फ्लॉप होण्याचे खापर मिलन लुथरिया यांच्या डोक्यावर फोडले. अजयने सांगितले की,चित्रपटाचे पहिले गाणे ‘रश्के कमर’ नंतर चित्रपटाच्या विषयाला एकदम वेगळेच सादर केले गेले. यामुळे चित्रपटाचे नुकसान झाले. प्रमोशन स्ट्रॅटेजी बनवली गेली, ती सुद्धा चित्रपटाला अनुसरून नव्हती. केवळ इतकेच नाही तर चित्रपटाच्या एडिटींगबद्दलही अनेक प्रेक्षकांनी तक्रार केली होती. मलाही एडिटींग फारशी आवडली नव्हती. मी यावरून मिलनसोबत जाम भांडलोही होतो. आपण जे शूट केले, ते काहीच चित्रपटात नाही. ते सगळे चित्रपटातून का गाळले गेले? असा प्रश्न मी त्याला केला होता. 
पण खरे सांगायचे तर आता या प्रश्नाचे उत्तर मिळूनही तसा फायदा नाही. कारण ‘बादशाहो’ फ्लॉप झालाय आणि अजयच्या नावावर तो जमा झालाय. कदाचित पुढल्यावेळी अजयसोबत काम करताना मिलन त्याच्या आवडी-निवडीचे खास लक्ष ठेवतील, अशी अपेक्षा आपण करूयात.

Web Title: Ajay Devgn's 'Badshaho' was flop, the person's hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.