अजय देवगणच्या ‘या’ अभिनेत्रीने चक्क डोनाल्ड ट्रम्पसोबत केले दिवाळी सेलिब्रेशन, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 19:11 IST2017-10-26T13:37:49+5:302017-10-26T19:11:47+5:30
अभिनेता अजय देवगण याच्यासोबत काम करणाºया या अभिनेत्रीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेशन केले आहे, वाचा सविस्तर!
.jpg)
अजय देवगणच्या ‘या’ अभिनेत्रीने चक्क डोनाल्ड ट्रम्पसोबत केले दिवाळी सेलिब्रेशन, पहा फोटो!
‘ ॅक्शन जॅक्शन’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याच्यासोबत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी माजी मिस इंडिया मानस्वी ममगई सध्या यूएसला सेटल झाली आहे. ती तेथील सामाजिक आणि राजकीय अॅक्टिव्हिटीमध्ये जबरदस्त सक्रियदेखील आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे तिने नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर दिवाळी सेलिब्रेशन केले आहे. तिने या सेलिब्रेशन सोहळ्यात केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागतच केले नाही तर संपूर्ण सोहळ्याची धुराही सांभाळली.
वास्तविक मानस्वी रिपब्लिकन हिंदू कोएलेशनमध्ये भारतीय अॅम्बेसेडर आहे. मानस्वीने या सोहळ्यातील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे काही फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या अधिकृत अकाउंटवरूनही मानस्वीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. खरं तर मानस्वी पहिल्यांदाच ट्रम्प यांना भेटली नाही, तर अमेरिका निवडणुकीदरम्यान ती वडील शलभ कुमार यांच्यासोबत बराच काळ ट्रम्प यांचे कॅम्पेन करीत होती. सध्या हे दोघेही गेल्या वर्षभरापासून आरएचसी चालवित आहेत.
त्यामुळेच मानस्वी अमेरिकेतील मोठमोठ्या राजकारण्यांबरोबर आतापर्यंत झळकली आहे. त्याबाबतचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही मानस्वीचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार मानस्वीने म्हटले की, ‘मला आरएचसीचा अॅम्बेसेडर बनून जवळपास एक वर्ष झाले आहे. यामाध्यमातून मी बºयाचशा हिंदू लोकांचे आयुष्य बदलविले आहे. आम्ही सर्वांत प्रो-हिंदू आणि प्रो-इंडियन अमेरिकी प्रधानमंत्र्यांची निवड केली आहे. जो पाकिस्तान आणि त्यांच्या आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी तत्परतेने काम करीत आहे. त्यामुळेच यंदाची दिवाळी आमच्यासाठी स्पेशल होती. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थिती लावून आमचा उत्सव द्विगुणित केला.