‘ओप्पम’च्या रिमेकमध्ये अक्षय नाही तर अजय देवगण दिसणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 11:47 IST2017-02-19T06:17:49+5:302017-02-19T11:47:49+5:30
दिग्दर्शक प्रियदर्शन धमाकेदार वापसीसाठी अगदी तयार आहेत. पण यावेळी त्यांनी अक्षय कुमारला नाही तर अजय देवगणला निवडले आहे. होय, ...
.jpg)
‘ओप्पम’च्या रिमेकमध्ये अक्षय नाही तर अजय देवगण दिसणार!
द ग्दर्शक प्रियदर्शन धमाकेदार वापसीसाठी अगदी तयार आहेत. पण यावेळी त्यांनी अक्षय कुमारला नाही तर अजय देवगणला निवडले आहे. होय, आम्ही बोलतोय, ते ‘ओप्पम’च्या रिमेकबद्दल.
‘ओप्पम’ हा मल्याळम चित्रपट. ‘ओप्पम’ या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक येतोय. या रिमेकसाठी आधी अक्षय कुमारशी बोलणी सुरु होती. पण अक्षय आपल्या चित्रपटांत व्यस्त आहे. त्यामुळे त्याच्या डेट्स मिळणे शक्य नाही. मग काय, अक्षयची फारशी वाट न पाहता प्रियदर्शन यांनी अजय देवगणशी संपर्क केल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर अजयला चित्रपटाची कथा अतिशय आवडलीयं.
प्रियदर्शन यांच्यासोबत अजयचा हा पहिला चित्रपट नक्कीच नसेल. यापूर्वी प्रियदर्शन व अजय या जोडीने ‘आक्रोश’ व ‘तेज’ या चित्रपटात काम केलेले आहे. अर्थात हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर अपयशी ठरले होते. पण आता अजयसोबत काम करण्यास प्रियदर्शन कमालीचे उत्सूक आहेत. अजयसोबत मला एक हिट सिनेमा तर बनवायचाच आहे, असे प्रियदर्शन यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात अजय एक सुपरहिट नक्की देणार, हे आत्ताच लिहून ठेवा.
खरे तर अक्षयप्रमाणेच अजय हा सुद्धा सध्या प्रचंड बिझी आहे. त्याचे एक-दोन नव्हे तर अर्धा डझन सिनेमे या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात ‘बादशाहो’,‘गोलमाल4’,‘बादशाहो’,‘सिंघम3’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय लव रंजन निर्मित एका चित्रपटात अजय दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. अर्थात नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. रोमॅन्टिक-कॉमेडी असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आकीव अली. याशिवाय येत्या मार्चपासून अजय हा रेमो डिसूजा दिग्दर्शिक एका नव्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी होणार आहे. हा धमाकेदार अॅक्शन चित्रपट खुद्द अजय प्रोड्यूस करणार आहे. यात त्याच्यासोबत सूरज पांचोली दिसणार आहे. हा चित्रपट एक टिपिकल अॅक्शन-डान्स चित्रपट असेल.