वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेला आणि Ajay Devgn ट्रोल झाला, फोटो पाहून नेटीझन्सची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 11:02 IST2021-04-04T10:55:01+5:302021-04-04T11:02:46+5:30

Ajay Devgn trolled After His Birthday Celebration: बॉलिवूड सिंघम अजय देवगणने वाढदिवस साजरा केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे त्याने सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून वाढदिवस या वर्षी साजरा केला नाही.

Ajay Devgn trolled After His Birthday Celebration photos when fans touching actors feet | वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेला आणि Ajay Devgn ट्रोल झाला, फोटो पाहून नेटीझन्सची सटकली

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेला आणि Ajay Devgn ट्रोल झाला, फोटो पाहून नेटीझन्सची सटकली

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी जग भरात लोकप्रियता असते. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी कलाकारांना रसिकांच्याच प्रेमापोटी मिळतात.

मात्र कधी कधी कलाकारमंडळी असे काही वागतात की, त्यांचे त्यांनाच कळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूड सिंघम अजय देवगणने वाढदिवस साजरा केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे त्याने सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून वाढदिवस या वर्षी साजरा केला नाही. मात्र वाढदिवसाच्या दिवशी त्याची काही चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले. 

अजय देवगण त्याच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या दिवशी नाराज करायचे नाही म्हणून चाहत्यांना भेटला आणि त्यांच्यासह चाहत्यांनी आणलेला केक कट करत सेलिब्रेशन केले. मात्र या सगळ्यात चाहत्यांनीही देवाप्रमाणे अजय देवगणचे पाया पडल्या आणि अजय देवगणने त्यांना पाया पडू दिल्या.

अजय देवगणच्या पाया पडताचाना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटीझन्सची चांगलीच सटकली आणि अजय देवगणला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांना यात काही गैर वाटले नसल्याचे म्हटले तर काहींनी मात्र नेगिटीव्ह कमेंट करत अजय देवगणला खरी खोटी सुनावत आहेत. 

अजय देवगणच्या वर्कफंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या त्याच्या कडे खूप प्रोजेक्ट आहेत. आगामी काळात 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', 'मैदान' आणि 'आरआरआर' सिनेमात तो झळकणार आहे. इतकेच नाही तर अजय देवगणचा निर्मिती असलेला अभिषक बच्चन स्टारर सिनेमा 'द बिग बुल' प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

अजय देवगण नेहमीच कोणत्याही सिनेमातील त्याचा एन्ट्री सीन खूप इंटेस ठेवतो. सिंघम याचे एक मोठे उदाहरण आहे. आता आरआरआरमधील त्याचा इंटेस लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अजयने ट्विटरवर जवळपास एक मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो खूप दमदार लूकमध्ये दिसतो आहे. त्याने एक शॉल परिधान केलेला आहे आणि त्याला काढताना त्याचे प्रभावशाली भूमिकेत दिसतो आहे. अजय देवगणला सैनिकांनी घेरलेले दिसत आहे आणि बॅकग्राउंडला तीन शब्द रिपीट होत आहेत लोड, एम शूट.

Web Title: Ajay Devgn trolled After His Birthday Celebration photos when fans touching actors feet