अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:02 PM2021-04-02T19:02:43+5:302021-04-02T19:04:41+5:30

अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट आरआरआरमधील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

Rajamouli gives birthday gift to Ajay Devgn, first look out of actor in 'RRR' | अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज ५२वा वाढदिवस साजरा करतो आहे. सध्या अजय देवगण कामात खूप व्यग्र आहे. आगामी दिवसांत तो बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट आरआरआरमधील त्याचा फर्स्ट लूक मोशन पिक्चर्समध्ये रिलीज करण्यात आला आहे. स्वतः अजय देवगणने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला. हा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अजय देवगण नेहमीच कोणत्याही सिनेमातील त्याचा एन्ट्री सीन खूप इंटेस ठेवतो. सिंघम याचे एक मोठे उदाहरण आहे. आता आरआरआरमधील त्याचा इंटेस लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अजयने ट्विटरवर जवळपास एक मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो खूप दमदार लूकमध्ये दिसतो आहे. त्याने एक शॉल परिधान केलेला आहे आणि त्याला काढताना त्याचे प्रभावशाली भूमिकेत दिसतो आहे. अजय देवगणला सैनिकांनी घेरलेले दिसत आहे आणि बॅकग्राउंडला तीन शब्द रिपीट होत आहेत लोड, एम शूट.


अजय देवगणने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, एस.एस. राजामौली मला इतके एक्साइटिंग आणि पावरफुल भूमिका दिल्यामुळे मी आभारी आहे. अजय देवगणच्या आधी अल्लूरी सीता रामाराजूच्या भूमिकेतील राम चरणचा लूक आउट झाला आहे.

तसेच आलिया भटच्या वाढदिवसादिवशी सीतेचा लूकदेखील रिलीज करण्यात आला होता.

आरआरआर चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट २०२१च्या दसऱ्याच्या दिवशी जगभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषेत रिलीज होणार आहे.

Web Title: Rajamouli gives birthday gift to Ajay Devgn, first look out of actor in 'RRR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.