संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:42 IST2025-01-29T12:42:04+5:302025-01-29T12:42:59+5:30

Sanjay Dutt And Ajay Devgan : संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

Ajay Devgn to clash with Sanjay Dutt, will be seen in a different avatar in the movie 'Ranger' | संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

सध्या बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) एकामागून एक चित्रपटांमध्ये दिसत आहे. या वर्षी त्याचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. आता असे वृत्त समोर आले आहे की अजय आणखी एका सिनेमात दिसणार आहे. ज्याचे नाव आहे 'रेंजर' (Ranger Movie). हा एक जंगल अ‍ॅडव्हेंचर चित्रपट असणार आहे ज्यामध्ये तो एका खतरनाक खलनायकाचा सामना करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते लव रंजन आणि जगन शक्ती यांच्या या चित्रपटात अजयला कास्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्त त्याच्या अपोझिट भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी सांगितले की, 'अजय देवगण आणि संजय दत्त यांना रेंजर या चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. स्क्रिप्ट पाहूनच हे कास्टिंग करण्यात आले आहे. कारण चित्रपटातील खलनायकाचा जो औरा संजय दत्तच्या आयुष्यातही आहे. चित्रपटाची कथा जंगलावर बेतलेली आहे. या चित्रपटासाठी निर्माते अजय देवगण आणि संजय दत्तचा खास लूक तयार करत आहेत. ज्यामध्ये तो फॉरेस्ट रेंजर किंवा रक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगण आणि संजय दत्त येणार आमनेसामने

सूत्रांनी पुढे सांगितले की, निर्माते २०२५च्या उन्हाळ्यात सिनेमाचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. 'चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम अजूनही सुरू आहे. रेंजरच्या आधी अजय देवगण आणि संजय दत्त काही चित्रपटांमध्ये दिसणार आहेत ज्यात ते कॉमेडी किंवा गंभीर भूमिका करताना दिसणार आहेत. मात्र रेंजरमधील दोघांचा आमनासामना मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा असणार आहे. 'लव रंजनला हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. जगन शक्ती व्हिएफएक्सचे काम पाहत आहे. वन्य प्राणी आणि जंगल तयार करण्याचे काम एका चांगल्या टीमकडे सोपवण्यासाठी ते जगातील अनेक मोठ्या व्हिएफएक्स कंपन्यांमध्ये जात आहेत.

Web Title: Ajay Devgn to clash with Sanjay Dutt, will be seen in a different avatar in the movie 'Ranger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.