"राष्ट्र उभारणीत संघाचं मोठं योगदान" अजय देवगणकडून RSSचं कौतुक, 'शतक'चा टीझर केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:40 IST2026-02-05T12:07:49+5:302026-02-05T12:40:16+5:30
अजय देवगणने 'शतक' या चित्रपटाचा टीझर शेअर करत संघाच्या कार्याचे जाहीर कौतुक केले आहे

"राष्ट्र उभारणीत संघाचं मोठं योगदान" अजय देवगणकडून RSSचं कौतुक, 'शतक'चा टीझर केला शेअर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'शतक: संघाची १०० वर्षे' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून संघाचा वैचारिक प्रवास आणि सामाजिक योगदानाची गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणने या चित्रपटाचा टीझर शेअर करत संघाच्या कार्याचे जाहीर कौतुक केले आहे.
अजय देवगणने ट्विट करत म्हटले की, "१०० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खूप खूप अभिनंदन! या १०० वर्षात राष्ट्र उभारणीत संघाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी 'शतक' हा चित्रपट येत आहे. त्याची पहिली झलक समोर आली आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा".
RSS ko sau saal poore hone par dher saari badhaaiyan! Inn sau saalon mein rashtra nirmaan mein sangh ka bada yogdaan raha hai. Iss kaam par aur roshni daalne aa rahi hai film #Shatak 🚩
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 3, 2026
Yeh rahi uski pehli jhalakhttps://t.co/yxZnzNUBAb
Shatak ke sampurn team ko meri ore se…
आशिष मल्ल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वीर कपूर हे निर्माते आहेत. "नेव्हर स्टॉप, नेव्हर टायर, नेव्हर बो" (कधीही थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणार नाही) ही या चित्रपटाची टॅगलाइन आहे. १८७५ ते १९५० दरम्यान सुरू झालेल्या चळवळींपैकी संघ हीच एकमेव अखंड सुरू असलेली संघटना असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. हा चित्रपट नि:स्वार्थ स्वयंसेवकांच्या पिढ्यांना समर्पित करण्यात आला असून, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी 'शतक' देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.