अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "तुम्ही काय करायचं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:26 IST2025-12-30T11:25:23+5:302025-12-30T11:26:03+5:30
अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर सर्वांना धक्का बसला. अखेर या प्रकरणावर एका वाक्यात अजयने सुचक प्रतिक्रिया दिली आहे

अक्षय खन्नाने 'दृश्यम ३' सोडल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "तुम्ही काय करायचं..."
'दृश्यम ३' सिनेमा सध्या रिलीजआधीपासूनच चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण ठरलाय तो म्हणजे अक्षय खन्ना. सिनेमाचं शूटिंग सुरु होण्यापूर्वीच अक्षयने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतली आहे. 'दृश्यम २'मध्ये पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारणारा अक्षय तिसऱ्या भागात मात्र दिसणार नाहीये. त्यामुळे निर्माते आणि सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक पाठक चांगलेच नाराज आहेत. अशातच या प्रकरणावर अजय देवगणची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अजय देवगणनेअक्षय खन्नाच्या एक्झिटवर दिली प्रतिक्रिया
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अभिषेक पाठकने याविषयी खुलासा केला. अभिषेक म्हणाला, ''सर्व काही ठरलं होतं आणि अक्षय खन्नाला सिनेमाची स्क्रीप्टही आवडली होती. अक्षय खन्नाचा लूक आणि कपडेपटही ठरला होता. परंतु धुरंधरच्या रिलीजच्या एक दिवस आधी अक्षयने सिनेमा सोडला. याविषयी अजय देवगणशी आमचं बोलणं झालं. तेव्हा तो म्हणाला, काय करायचं ते तुम्ही बघा. तसंही ही गोष्ट निर्माते आणि माझ्यामधली गोष्ट आहे.''
अभिषेक पाठक अक्षयवर नाराज
अभिषेक पाठकने पुढे खुलासा केला की, "नोव्हेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर हे सगळं झालं. त्याने शूटिंग सुरु होण्याच्या पाच दिवस आधी सिनेमा सोडला. लूकही लॉक झाला होता, कॉस्च्युम बनले होते, नरेशन झालं होतं आणि त्याला आवडलंही होतं. धुरंधर रिलीजच्या एक दिवस आधी त्याने सिनेमा सोडला. त्याला सिनेमात विग घालायचा होता. मात्र दृश्यम २ जिथे संपला तिथूनच दृश्यम ३ सुरु होणार आहे. त्यामुळे अक्षयला मी विग घालायला परवानगी दिली नाही. मी त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला समजावलं. पण त्याने ऐकलं नाही. आपण पुढे पाहू असं मी त्याला सांगितलं पण त्याने सिनेमा सोडला."
अजय देवगण, तब्बू, श्रिया सारन, रजत कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'दृश्यम ३' सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम ३' हा या फ्रँचायझीचा अखेरचा सिनेमा असेल, अशी शक्यता आहे. अक्षय खन्नाच्या जागी 'दृश्यम ३'मध्ये कोण दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.