कोरोना व्हायरसमुळे अजय देवगणच्या 'मैदान'ची बदलली रिलीज डेट, आता यादिवशी होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 15:42 IST2020-07-04T15:41:59+5:302020-07-04T15:42:51+5:30
अजय देवगणने सोशल मीडिया अकाऊंटवरून याची माहिती दिली.

कोरोना व्हायरसमुळे अजय देवगणच्या 'मैदान'ची बदलली रिलीज डेट, आता यादिवशी होणार रिलीज
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. येणाऱ्या काळ्यात मोठ्या सिनेमांच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. अजय देवगण स्टारर मैदान सिनेमा यापैकीच एक आहे. हा सिनेमा वर्ल्ड फुटबॉलवर आधारित आहे. हा सिनेमा 13 ऑगस्ट 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण सोशल मीडिया अकाऊंटवरून याच माहिती दिली. अजय देवगणने सोबतचा सिनेमाचा पोस्टरसुद्धा शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये अजय हातात फुटबॉल घेऊन उभा आहे आणि दोन फुटबॉल त्याच्या पायाखाली आहे.
या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल. अजय देवगन सोबत प्रियामणि, गजराज राव आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुद्रनील घोष या चित्रपटात आहेत. अमित आर शर्मा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओ, बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता यांनी केलीय.