५७व्या वाढदिवशी अजय देवगणने स्वत:ला दिलं मोठं गिफ्ट, बॉलिवूडच्या सिंघमने खरेदी केली मर्सिडीज कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:28 IST2026-04-03T11:27:01+5:302026-04-03T11:28:01+5:30

अजय देवगणने सर्वात महागडी समजली जाणारी मर्सिडीज कंपनीची गाडी खरेदी केली आहे. मर्सिडीज बेंझ व्ही क्लास (Mercedes-Benz V-Class) ही गाडी अजय देवगणने घरी आणली. जिची किंमत तब्बल १.४० कोटी इतकी आहे. 

ajay devgn busy mercedes benz car on his 57th birthday | ५७व्या वाढदिवशी अजय देवगणने स्वत:ला दिलं मोठं गिफ्ट, बॉलिवूडच्या सिंघमने खरेदी केली मर्सिडीज कार

५७व्या वाढदिवशी अजय देवगणने स्वत:ला दिलं मोठं गिफ्ट, बॉलिवूडच्या सिंघमने खरेदी केली मर्सिडीज कार

बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याचा ५७वा वाढदिवस साजरा केला. अजयने ५७व्या वाढदिवसाला स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. बॉलिवूडच्या सिंघमने वाढदिवशी नवी कार घरी आणली आहे. अजय देवगणने वाढदिवशी स्वत:लाच हे महागडं गिफ्ट दिलं आहे. अजय देवगणने सर्वात महागडी समजली जाणारी मर्सिडीज कंपनीची गाडी खरेदी केली आहे. मर्सिडीज बेंझ व्ही क्लास (Mercedes-Benz V-Class) ही गाडी अजय देवगणने घरी आणली. जिची किंमत तब्बल १.४० कोटी इतकी आहे. 

मर्सिडीज ही आलिशान कंपनी आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटींकडे, कलाकारांकडे आणि बिजनेसमॅनकडे मर्सिडीज कंपनीच्या गाड्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मर्सिडीज कंपनीने गाडीचं नवं मॉडेल मार्केटमध्ये आणलं. त्यानंतर हार्दिक पांड्या, शाहरुख खाननेही मर्सिडीजचं हे नवं मॉडेल खरेदी केलं होतं. आता त्यांच्या रांगेत अजय देवगणही जाऊन बसला आहे. त्याच्याकडे आधीच मर्सिडीज कंपनीच्या मेबॅक जीएलएस ६०० आणि मर्सिडीज बेंझ जीएल क्लास या दोन गाड्या आहेत. आता त्यात आणखी एका मर्सिडीजची भर झाली आहे. 

अजय देवगणकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रोल्स रॉयस, मर्सिडीज, रेंज रोव्हर, बीएमडब्लू या कंपनीच्या गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत. रोल्स रॉयस कलिनन (६.९५ कोटी), मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६०० (३ कोटी), बीएमडब्लू एक्स ७, रेंज रोव्हर वोग, मिनी कंट्रीमॅन, मर्सिडीज बेंझ जीएल क्लास या गाड्या अजय देवगणकडे आहेत. 

Web Title : 57वें जन्मदिन पर अजय देवगन ने खुद को गिफ्ट की मर्सिडीज कार

Web Summary : अजय देवगन ने अपने 57वें जन्मदिन पर खुद को 1.40 करोड़ रुपये की मर्सिडीज-बेंज वी-क्लास गिफ्ट की। उनके पास पहले से ही मर्सिडीज मेबैक जीएलएस 600 और रोल्स रॉयस कलिनन सहित कई लग्जरी कारें हैं।

Web Title : Ajay Devgn gifts himself a Mercedes on his 57th birthday.

Web Summary : On his 57th birthday, Ajay Devgn bought himself a Mercedes-Benz V-Class worth ₹1.40 crore. He already owns several luxury cars, including Mercedes Maybach GLS 600 and Rolls Royce Cullinan, adding to his impressive collection.