​अजय देवगन, अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा लढणार एकमेकांविरुद्ध; मार्शल आर्ट सुपर फाईट लीगचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 03:59 PM2017-01-17T15:59:00+5:302017-01-17T15:59:00+5:30

जगातील पहिली संमिश्र मार्शल आर्टस् (एमएमए) सुपर फाईट लीगचे (एसएफएल)आयोजन भारतात करण्यात आले आहे. या स्पर्धेला प्रसिद्धी मिळावी यासाठी ...

Ajay Devgn, Arjun Rampal, Randeep Hooda fight against each other; Organizing the Martial Arts Super Fight League | ​अजय देवगन, अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा लढणार एकमेकांविरुद्ध; मार्शल आर्ट सुपर फाईट लीगचे आयोजन

​अजय देवगन, अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा लढणार एकमेकांविरुद्ध; मार्शल आर्ट सुपर फाईट लीगचे आयोजन

googlenewsNext
ातील पहिली संमिश्र मार्शल आर्टस् (एमएमए) सुपर फाईट लीगचे (एसएफएल)आयोजन भारतात करण्यात आले आहे. या स्पर्धेला प्रसिद्धी मिळावी यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटींनी पुढाकार घेतला असून, मार्शल आर्ट्सच्या मैदानात बॉलिवूडचा सिंघम स्टार अजय देवगन, अर्जुन रामपाल व रणदीप हुड्डा एकमेकाविरुद्ध लढणार आहेत. सुपर फाईट लीग या स्पर्धेत सहभागी होणारे संघ या तीन बॉलिवूड अभिनेत्यांनी विकत घेतले आहेत. 

मागील काही वर्षांपासून बॉलिवूड सेलेब्रिटी खेळाच्या मैदानातही आपली हजेरी लावत असल्याचे आपण पाहतो आहोत. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या टी-२० क्रिकेट स्पर्धेतील काही संघ बॉलिवूड सेलेब्रिटींनी विकत घेतले होते. यामुळे अभिनेत्यांच्या खेळामधील रुचीची प्रशंसा करण्यात आली होती. यानंतर काही कलावंतानी प्रो-कब्बडी या कबड्डी स्पर्धेतील संघाचे पालकत्व स्वीकारले. यामुळे प्रो-कबड्डीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. फु टबॉल व हॉकी या खेळाच्या प्रोफेशनल स्पर्धांमध्येही अनेक बॉलिवूड कलावंतांनी आपले स्वारस्य दाखविले आहे. 

sf[ojbh'sojfd

आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांनी खेळात आपले स्वारस्य दाखवित मिक्स मार्शल आर्टस् या खेळाच्या ‘सुपर फाईट लीग’ या स्पर्धेसाठी संघ विकत घेतले आहेत. अर्जुन रामपाल याने आपल्या ट्विटर अकाऊंटहून ही माहिती दिली. त्याने अजय देवगन व रणदीप हुड्डा यांच्यासह ‘एसएफएल’मध्ये सहभागी होणारया खेळाडूसोबतचा एक फोट अपलोड केला आहे. अर्जुन रामपाल, अजय देवगन व सलीम मर्चंट व रणदीप हुड्डा यांनी दिल्ली संघ विकत घेतला आहे.  

‘सुपर फाईट लीग’ या स्पर्धेत दिल्ली, उत्तरप्रदेश, मुंबई, हरयाणा, बंगळुरू, पंजाब, पुणे आणि गोवा हे आठ संघ सहभागी होणार आहेत. यात अनूप कुमार, सीजे सिंह, अमित राय, ध्रुव चौधरी सारखे मार्शल आर्ट फायटर भाग घेणार आहेत. प्रत्येक टीममध्ये नऊ भारतीय व तीन आंतरराष्ट्रीय फायटर्स समाविष्ट असतील. महिला खेळाडूंना देखील समान संधी मिळणार आहे. यात एकू ण ९६ फायटर सहभागी होणार आहेत. 

The brand new #SFL gonna be all the more exciting. With friends @ajaydevgn@salim_merchant@RandeepHooda#delhiherospic.twitter.com/8ZKkwvTP1m— arjun rampal (@rampalarjun) January 13, 2017 ">http://

}}}}

Web Title: Ajay Devgn, Arjun Rampal, Randeep Hooda fight against each other; Organizing the Martial Arts Super Fight League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.