आता माझी सटकली! 'या' कारणामुळे निसाला वाटते अजयची भीती'; काजोलने सांगितलं कसं आहे बाप-लेकीचं नात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:08 PM2023-12-14T15:08:49+5:302023-12-14T15:12:50+5:30

Kajol: करीना कपूरच्या चॅट शोमध्ये काजोलने निसा आणि अजय या दोघांचं नातं नेमकं कसं आहे हे सांगितलं.

ajay-devgn-and-daughter-nysa-devgan-secret-reveal-by-kajol | आता माझी सटकली! 'या' कारणामुळे निसाला वाटते अजयची भीती'; काजोलने सांगितलं कसं आहे बाप-लेकीचं नात

आता माझी सटकली! 'या' कारणामुळे निसाला वाटते अजयची भीती'; काजोलने सांगितलं कसं आहे बाप-लेकीचं नात

सध्या इंडस्ट्रीमध्ये स्टारकिड्सची चलती आहे त्यामुळे सुहाना खानपासून (suhana khan) ते निसा देवगणपर्यंत  (nysa devgan) अनेक जण सातत्याने चर्चेत येत आहेत. यात खासकरुन तर सुहाना आणि निसा या दोघी तर सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. साधारणपणे प्रत्येक लेक ही वडिलांची लाडकी असते. परंतु, निसा आणि अजय देवगण  (ajay devgn) यांचं नातं थोडं वेगळं आहे. अलिकडेच काजोलने (kajol)एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने निसा आणि अजय या बापलेकीच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

अलिकडेच काजोलने करीना कपूरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने निसा आणि अजय यांच्या नात्यावर भाष्य केलं. निसा अजयची खूप लाडकी आहे. पण, एका बाबतीत ती त्याला प्रचंड घाबरते आणि त्यावेळी तिला माझी गरज लागते असा खुलासा काजोलने केला.

"ज्यावेळी एखादं सिक्रेट, काही प्रॉब्लेम किंवा इतर काही त्रास असेल तर निसा त्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करते. जर बॉयफ्रेंड किंवा एखाद्या मित्राविषयी काही असेल तर अजय चिडेल या भीतीपोटी ती कायम माझ्यासोबत या गोष्टी शेअर करते," असं काजोल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "जर एखादी सुट्टी प्लॅन करायची असेल, मज्जामस्ती करायची असले तर दोन्ही मुलांना अजयच हवा असतो." दरम्यान, अजय निसाच्या बाबतीत फार पझेसिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: ajay-devgn-and-daughter-nysa-devgan-secret-reveal-by-kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.