२० वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अन् तिच्या प्रेमात गुंतलेला अजय! 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:02 IST2025-10-15T12:54:41+5:302025-10-15T13:02:06+5:30
प्रेमाला वयाचं बंधन नसतं! अजय देवगण-रकुलच्या 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज,तुम्ही पाहिला?

२० वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अन् तिच्या प्रेमात गुंतलेला अजय! 'दे दे प्यार दे २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिला?
De De Pyaar De 2 Movie: अभिनेता अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंगच्या 'दे दे प्यार दे' हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. एक तरुण मुलगी, दुप्पट वयाच्या पुरूषाच्या प्रेमात पडते आणि कथानकात नवे ट्विस्ट येतात. ही कहाणी लोकांना खूप रंजक वाटली. त्यानंतर आता ६ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'दे दे प्यार दे' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ५० वर्षीय आशीष २० वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडतो. जेव्हा ही तरुणी त्याची आपल्या कुटुंबियांसोबत भेट घडवून आणते. तेव्हा त्यादरम्यान, ज्या मजेशीर गोष्टी घडतात.त्या पाहून प्रेक्षक खळखळून हसायला लागतील, एवढं मात्र,नक्की.
नुकताच 'दे दे प्यार दे-2' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून सिनेरसिकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये रकुल प्रीत सिंगअजय देवगणच्या घरात राहायला जाते. यावेळी, उलट चित्र पाहायला मिळतंय. दे दे प्यार द २ मध्ये अजय देवगण रकुलच्या पालकांसोबत राहायला येतो. एकंदरीत या या चित्रपट पाहाताना प्रेक्षकांना रोलर-कोस्टर राईडचा अनुभव मिळणार आहे. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात अभिनेता आर.माधवन रकुलच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या या पात्राविषयी देखील चर्चा रंगली आहे.
दरम्यान, 'दे दे प्यार दे २' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, आर. माधवन, जावेद जाफरी आणि इशिता दत्ता यांच्या भूमिका आहेत. अंशुल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.